पहिल्या दिवशी त्याला ड्रेसिंग रुममध्ये....
पहिल्या दिवशी मी त्याला फोन केला, तेव्हा त्याने फोन घेतला नाही. त्याकडे फोन नव्हता. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून तो फोनवर बोलतोय. याचा अर्थ तो चांगल्या स्थितीत आहे. पहिल्या दिवशी मी फिजिओला फोन करून माहिती घेतली होती. श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. तो बोलतोय त्यामुळे तो नॉर्मल असल्याचं कळतंय. बाकी माहिती डॉक्टरांना आहे. पहिल्या दिवशी त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेलं तेव्हा वाटलं की त्याला हॉस्पिटलला घेऊन जाण्याची गरज आहे, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
श्रेयसला फुल सपोर्ट
क्रिकेटमध्ये असं कधी होत नाही, खूप रेअर गोष्टी अशा होतात, पण श्रेयस देखील रेअर आहे. देवाने साथ दिली म्हणून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बीसीसीआयचा श्रेयसला फुल सपोर्ट आहे. त्यानंतर श्रेयसला आम्ही सोबत घरी घेऊ जाऊ, असं म्हणत सूर्याने टेन्शन कमी केलं. त्यानंतर पत्रकार परिषदेत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
दरम्यान, टीम इंडियाचा चॅम्पियन बॅट्समन श्रेयस अय्यर याला रिब केजच्या दुखापतीमुळे झालेल्या इंटरनल ब्लीडिंगमुळे सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीमधील सुधारणेनुसार, त्याला 2 ते 7 दिवसांपर्यंत ऑब्झर्वेशनखाली (Under Observation) ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
