TRENDING:

Hardik Pandya : ट्रोल केलं, व्हाईस कॅप्टन्सी काढली! अक्षर पटेल नाही तर शेवटी तोच मदतीला धावून आला, सूर्याचा शॉकिंग खुलासा!

Last Updated:

Hardik Pandya help Team India after loss against South Africa : ज्याच्याकडून कॅप्टन्सी काढली.. व्हाईस कॅप्टन्सी काढली, अखेरच तोच टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. सूर्याने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर याचा किस्सा सांगितला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hardik Pandya help Team india : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं जातंय. कुणा एका खेळाडूने नाही तर सांघिक कामगिरीने टीम इंडियाने ट्रॉफी उचलली आहे. अशातच आता कॅप्टन सूर्याने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अनेक खुलासे केले आहेत. ज्याला सर्वात जास्त ट्रोल केलं गेलं, ज्याच्याकडून कॅप्टन्सी काढली.. व्हाईस कॅप्टन्सी काढली, अखेरच तोच टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. सूर्याने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर याचा किस्सा सांगितला.
Suryakumar yadav Reveal Hardik Pandya help In dressing Room
Suryakumar yadav Reveal Hardik Pandya help In dressing Room
advertisement

हार्दिक पांड्याने पुढाकार घेतला अन्...

नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच जिंकल्यानंतर आता आम्हाला खात्री पटली आहे की, या स्टेडियममध्ये कोणतीही समस्या नाही, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. मात्र, सुपर 8 मध्ये जेव्हा टीम इंडिया पहिली मॅच याच स्टेडियमवर हारली तेव्हा सर्वांना टेन्शन आलं होतं. पण टूर्नामेंटमधील टर्निंग पॉईंट हा साऊथ आफ्रिकेविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये मिळालेल्या धक्क्या नंतर आला. त्या कठीण प्रसंगानंतर सूर्याने टीमचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पांड्या याला पुढाकार घेण्यास सांगितलं. टीमला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी पांड्याचा अनुभव कामाला आला.

advertisement

बॅटिंग युनिटची एक बैठक बसली

टीम इंडियाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये बॅटिंग युनिटची एक बैठक झाली. हार्दिक पांड्याने ही बैठक लीड केली. सूर्यकुमार यादव देखील त्याच्यासोबत होता. पण पांड्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना बॅक टू बेसिक जाण्यास सांगितलं. टीम इंडियाचा साऊथ अफ्रिकाविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे पांड्याने बैठकीत काही मुद्दे मांडले अन् पुढच्याच सामन्यात टीम इंडियाने विजयाचा पताका फडकवला. त्यावर सूर्याने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खुलासा केला आहे.

advertisement

Hardik Pandya : नताशा नाही तर पांड्याच निघाला धोकेबाज? स्टेडियमवर गर्लफ्रेंडसोबत फालतूपणा अन् आता इन्स्टाग्राम पोस्टमुळे पोलखोल

हार्दिक पांड्याविरुद्ध पुण्यात तक्रार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
सर्व पहा

दरम्यान, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या जोरदार ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. पांड्याने सगळं नीट केलं पण फायनल जिंकल्यानंतर माती खाल्ली. मॅच झाल्यानंतर पांड्या गर्लफ्रेंड माहिकासोबत नको ते कृत्य करताना दिसला. त्यामुळे आता हार्दिक पांड्यावर पुण्यात तक्रार देखील दाखल केली गेली आहे. जग खपवून घेईन पण तिरंग्याचा अपमान पुणेकर खपवून घेणार नाही, याची प्रचिती पुन्हा पहायला मिळाली. पुण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पांड्याला मुंबई विमानतळावर पाहिले गेले आणि मीडिया रिपोर्टनुसार, पांड्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत माहिका शर्मासोबत स्वित्झर्लंडला गेला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : ट्रोल केलं, व्हाईस कॅप्टन्सी काढली! अक्षर पटेल नाही तर शेवटी तोच मदतीला धावून आला, सूर्याचा शॉकिंग खुलासा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल