निर्णय वैयक्तिक नसून टीमचा - सूर्या
सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्ही इथे केवळ क्रिकेट खेळण्यासाठी आलो होतो आणि आमच्या विजयानेच आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले आहे. मैदानावरचे आमचे वर्तन हे बीसीसीआय आणि सरकारसोबत असलेल्या आमच्या भूमिकेशी जुळणारे आहे." यादवच्या या वक्तव्याने हे स्पष्ट होते की, हा निर्णय वैयक्तिक नसून टीमचा आणि देशाच्या भावनांचा आदर करणारा होता.
advertisement
पहलगाम हल्ल्याला कडक प्रत्युत्तर
हा निर्णय अलीकडेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. बीसीसीआय आणि सरकारने मॅच खेळायला परवानगी दिली असली तरी, खेळाडूंच्या मनात देशाबद्दल आणि पीडित कुटुंबांबद्दल आदर होता. म्हणूनच, मॅच जिंकल्यानंतरही टीमने जास्त जल्लोष केला नाही. खेळाडूंनी मॅचच्या निकालाला शांतपणे स्वीकारले, जे त्यांच्या व्यावसायिक भूमिकेचे प्रतीक होतं.
मैदानावरचा तणाव
दरम्यान, हा प्रसंग दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण बनला आहे. पूर्वीच्या मॅचमध्ये खेळाडूंचे मैदानावरचे संबंध सौहार्दपूर्ण होते, अनेकदा ते एकमेकांशी हस्तांदोलन करताना किंवा बोलताना दिसायचे. मात्र, यावेळी मैदानावरचा तणाव स्पष्टपणे दिसून आला.