काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
आम्ही सर्वजण आधीच इमोशनल होतो. आम्हाला वाटलं आशिया कप होणार नाही. पण नंतर कळालं की आशिया कप होणार... दुबईला गेल्यावर आम्ही ठरवलं की हँडशेक करायचा नाही. काय करायचं? यावर आम्ही चर्चा केली. पाकिस्तानकडून काहीतरी येणार हे आम्हाला माहिती होतं. पाकिस्तानमध्ये निराशा होती. त्यावेळी आम्ही सगळे एकत्र आलो ड्रेसिंग रुममध्ये आम्ही बसलो. 15 मिनिटं आमची मिटिंग झाली, काय करायचं? यावर सर्वांनी मत मांडलं, असा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.
advertisement
पाकिस्तानचा संघ बावचळला होता - सूर्यकुमार यादव
त्यावेळी आम्ही ठरवलं की, आता फक्त क्रिकेटवर लक्ष देऊ. आमच्याकडे चांगली संधी होती, पाकिस्तानला हरवण्याची... आम्ही ठरवलं की, क्रिकेट चांगलं खेळूया आणि या ग्राऊंडवर पण त्यांना हरवूया, असं आमचं ठरलं होतं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. पाकिस्तानने रडीचा डाव खेळला का? असा प्रश्न विचारल्यावर... क्रिकेटच्या मैदानात आम्ही निवांत खेळलो. पण पाकिस्तान बावचळला होता. पाकिस्तानवाले काही वेगळं वेगळं बोलत होते. ग्राऊंडवर पण पाकिस्तानचा संघ बावचळला होता, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
घरी पोहोचताच सूर्यकुमारचे औक्षण
दरम्यान, आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादव याचे त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच इमारतीत राहणारे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्याचे शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केले. यावेळी सूर्यकुमारचे औक्षणही करण्यात आले. त्यानंतर सूर्यकुमार याने शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटो सेशन देखील केले.