दिव्यांग खेळाडूंना मार्गदर्शन
दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचं काम पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र ही संस्था करते. खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये दिव्यांग खेळाडूंची निवड व्हावी यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जातात. आजवर अनेक खेळाडूंसाठी ही संस्था यशाचे शिखर गाठणारी पायरी ठरली आहे.
advertisement
मुलांच्या हट्टासाठी पैसे खर्चण्याची गरज नाही, आता लायब्ररीत मिळणार खेळणी
सरावासाठी सुविधा मिळत नाहीत
पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे यांनी स्पर्धांसाठी मैदाने उपलब्ध होत असली तरी सरावासाठी सुविधा मिळत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. यामुळेच खेळाडूंकडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन व्हावे यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
50 मीटर लांबीचे पूल नसल्याने अडचण
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सिद्धी दळवी या खेळाडूने 5 प्रकारच्या जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. सिद्धी मागील 8 वर्षांपासून विविध प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात 50 मीटर लांबीचे पूल उपलब्ध नाहीत. मात्र स्पर्धेसाठी 50 मीटर लांबीचे पूल आवश्यक आहेत. यामुळे खेळाडू मागे पडत असल्याने सरावासाठी 50 मीटर लांबीचे पूल उपलब्ध व्हावेत, अशी मागणी सिद्धी करते.
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द कायम ठेवून या मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग स्पर्धक आले होते.