12 वर्षांनंतर टी-20 लीगचं कमबॅक
मागच्या दोन दशकांमध्ये जगभरात टी-20 क्रिकेटचा प्रसार वेगाने झालेला आहे. सामन्याचा वेग, रोमांचक निकाल आणि मनोरंजनामुळे टी-20 क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे, त्यामुळे आता टी-20 चॅम्पियन्स लीगही परत येणार आहे. टी-20 चॅम्पियन्स लीगमध्ये जगभरातल्या टॉप टी-20 फ्रँचायझी टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये टी-20 चॅम्पियन्स लीगला पुन्हा सुरूवात होईल, अशी वृत्त माध्यमांमध्ये समोर आली आहेत.
advertisement
टी-20 चॅम्पियन्स लीगचा पहिला हंगाम 2008 साली सुरू झाला आणि शेवटचा हंगाम 2014 साली खेळवला गेला. शेवटच्या मोसमात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी जिंकली होती. द सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील वृत्तानुसार आयसीसीच्या बैठकीत सदस्यांमध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 च्या पुनरागमनावरही चर्चा झाली आहे. आयसीसी सदस्यांमध्ये ही टी-20 स्पर्धा पुन्हा सुरू करण्यावर एकमत झालं आहे, त्यामुळे चॅम्पियन्स लीग पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू केली जाईल, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
खेळाडूंसमोर आव्हान
चॅम्पियन्स लीग परत आल्यावर खेळाडूंनाही मोठे आव्हान असेल. जगातील अनेक अव्वल टी-20 खेळाडू दरवर्षी किमान दोन आणि अनेकदा चार किंवा पाच वेगवेगळ्या फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेतात. अशा परिस्थितीत, त्यांना टी-20 चॅम्पियन्स लीगमध्ये कोणत्या क्लबकडून खेळायचे? हे ठरवावे लागेल.