एकीकडे पाकिस्तानच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असतानाच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्ड कपचा किट लॉन्च इव्हेंट अचानक रद्द केला आहे. पाकिस्तानच्या किट लॉन्चचा कार्यक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्याच्या टॉसनंतर लगेचच होणार होता.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने औपचारिक परवानगी न दिल्यामुळे किट लॉन्च इव्हेंट स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय सोमवारी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचं का नाही? याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, त्यामुळे पीसीबी असा कोणताही कार्यक्रम आयोजित करू इच्छित नाही, ज्यामुळे पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, हे स्पष्ट होईल.
advertisement
पाकिस्तान सरकारकडून अजूनही पीसीबीला वर्ल्ड कपच्या सहभागाबाबत ग्रीन सिग्नल मिळालेला नाही, पण टीमकडून वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे. माध्यमांमधल्या वृत्तांनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपसाठी टीम 2 फेब्रुवारीला सकाळी कोलंबोला रवाना करण्याचा कार्यक्रम आधीच ठरवला आहे, पण आता किट लॉन्च इव्हेंट रद्द केल्यामुळे याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
