TRENDING:

T20 World Cup आधी गंभीरला धक्का, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा मोहरा फुटला, श्रीलंकेचा कोच झाला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपला फक्त एक महिना शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रीलंका क्रिकेटने मोठा डाव खेळला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपला फक्त एक महिना शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रीलंका क्रिकेटने मोठा डाव खेळला आहे. स्थानिक खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी श्रीलंकेने टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या कोचची नियुक्ती केली आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असताना टीम इंडियाचा बॅटिंग कोच असलेला विक्रम राठोड टी-20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या टीमसोबत काम करणार आहे.
T20 World Cup आधी गंभीरला धक्का, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा मोहरा फुटला, श्रीलंकेचा कोच झाला!
T20 World Cup आधी गंभीरला धक्का, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा मोहरा फुटला, श्रीलंकेचा कोच झाला!
advertisement

विक्रम राठोड हा राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारतीय टीमचा बॅटिंग कोच होता. विक्रम राठोड बॅटिंग कोच असतानाच टीम इंडियाने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा पहिला सामना 8 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी विक्रम राठोड याला टीममध्ये सामील केलं आहे. 15 जानेवारीला विक्रम राठोड श्रीलंकेच्या टीमसोबत काम सुरू करेल. त्याआधी मंगळवारी श्रीलंकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी श्रीलंका 7 जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध 3 मॅचची टी-20 सीरिज खेळणार आहे.

advertisement

विक्रम राठोडचं करिअर

विक्रम राठोड हा यशस्वी प्रथम श्रेणी बॅटर राहिला आहे. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 हजार पेक्षा जास्त रन आणि 33 शतकं आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो 6 टेस्ट आणि 7 वनडे खेळला होता. बॅटिंग कोच म्हणून विक्रम राठोडची टीम इंडियासोबतची कामगिरी उत्कृष्ट होती. विक्रम राठोड बॅटिंग कोच असताना टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात 2020-21 साली टेस्ट सीरिज जिंकली, याशिवाय भारतीय टीम 2023 वनडे वर्ल्ड कपची उपविजेतीही होती. विक्रम राठोड ने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल टीमनाही कोचिंग केलं आहे. तसंच तो राहुल द्रविडच्या कोर टीमचाही भाग होता.

advertisement

टी-20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेची टीम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल झणझणीत, मसालेदार आगरी पद्धतीनं बनवा चिंबोरी रस्सा, रेसिपीचा Video
सर्व पहा

दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिल मिशारा, कुसल परेरा, धनंजय डि सिल्वा, निरोशन डिकवेला, जनिथ लियानागे, चरिथ असलंका, कामिंदु मेंडिस, पवन रथनायके, नुवान तुषारा, एशान मलिंगा, दुश्मंता चमीरा, प्रमोद मदुशान, मथिशा पथिराणा, दिलशान मधुशंका, महीश तीक्षणा, दुशन हेमंथा, विजयकांत वियासकंथ, त्रवीन मॅथ्यू

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup आधी गंभीरला धक्का, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा मोहरा फुटला, श्रीलंकेचा कोच झाला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल