एखादा सामना कोणत्याही संघाने जितक्या जास्त धावा राखून जिंकला किंवा विकेटस राखून जिंकला तर त्याचा नेट रननेटवर खूप परिणाम होता.भारताच्या बाबतीतही तेच घडलं आहे.भारताने एकतर युएईला 57 धावांवर ऑल आऊट केले. त्यात त्यांनी दिलेले आव्हान देखील 4.3 ओव्हरमध्ये सहज गाठले.अशाप्रकारे 9 विकेटसने भारताने हा सामना जिंकला होता.इतक्या मोठ्या फरकाने भारताने हा सामना जिंकल्याने त्यांचा रनरेट +10.483 झाला आहे.यासोबत गुणतालिकेत टीम इंडिया 2 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचली आहे.
advertisement
कसा रंगला सामना ?
टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.त्यामुळे युएई प्रथम फलंदाजीसाठी उतरली होती.युएईच्या सलामीवीरांनी चांगली सूरूवात केली होती. अलिशान शराफूने 17 बॉलमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर मुहम्मद वसीमने 19 धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचे विकेट पडल्यानंतर इतर 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले होते.अशाप्रकारे युएई 13 ओव्हर 1 बॉलमध्ये 57 धावांवर ऑल आऊट झाली होती.
टीम इंडीयाच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 4,शिवम दुबेने 3, जसप्रीत बुमराह,अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
टीम इंडियासमोर 58 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 4.3 ओव्हरमध्ये हे आव्हान पुर्ण केले होते. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने 30 धावा केल्या होत्या.त्याच्यासोबत शुभमन गिल 20 आणि सुर्यकुमार यादव 7 वर नाबाद राहिला.अशाप्रकारे भारताने 9 विकेट राखून हा सामना जिंकला.
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
संयुक्त अरब अमिराती (प्लेइंग इलेव्हन): मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकिपर), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहीद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग