गंभीरने केलं ऋषभचं कौतुक
टीम इंडियाचे पाया खऱ्या अर्थाने ऋषभने जे काही केलं, त्यावर आधारलेला आहे. मला व्यक्तिगत बोलायला आवडत नाही. मला व्यक्तिगत कामगिरीवर बोलायला कधीच आवडणार नाही पण तू आज जे काही केलं, ते फक्त ड्रेसिंग रुमला प्रेरित केलं नाही तर तू पुढच्या जनरेशनला प्रेरित केलंय आणि ढसा उमटवला आहे. त्यामुळे आम्हाला आणि संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे, असं गौतम गंभीर ऋषभ पंतचं कौतूक करत म्हणाला.
advertisement
ऋषभ पंत म्हणाला...
देशाला आणि माझ्या टीमला जिंकवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेल. माझ्या खासगी कामगिरीपेक्षा टीमचं हित माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाची कामगिरी खरंच उल्लेखनिय होती. जशा प्रकारे दडपण होतं, पण जेव्हा संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा असतो, तेव्हा ती भावना तेव्हा ते मांडणं अवघड असतं, असं ऋषभ पंत म्हणाला. त्यावेळी ऋषभ पंत याने टीम इंडियाला मेसेज देखील दिला. आता अखेरच्या सामन्यात जिंकून या, देशासाठी खेळा, असं ऋषभ म्हणतो.
ऋषभचा देशाला अभिमान - वॉशिंग्टन सुंदर
दरम्यान, ऋषभ ज्या समस्येतून जातोय, ते खरंच खूप वेदनादायी आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रँक्चर आहे. मी जेव्हा त्याचा पाय पाहिला, तेव्हा त्याचा पाय खूप सुजला होता. अशा परिस्थितीत चालणं अवघड असतं पण त्याने त्याहून मोठं काम केलंय. देशाला त्याचा अभिमान आहे, असं वॉशिंग्टन सुंदर म्हणाला.