भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या वन-डे सीरिजमधील पहिल्या दोन मॅचमध्ये ऋतुराज खेळला होता. त्यानंतर आता चीनमधील हांगझोऊ इथं सुरू असलेल्या एशियन गेम्ससाठी तो रवाना होणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या टीम इंडियाचा ऋतुराज कॅप्टन आहे. या टीमकडून सर्वांनाच गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. गोल्ड मेडलसाठी बॅटिंग करण्यापूर्वी ऋतुराजनं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं.
advertisement
ठाण्याच्या रुद्राक्ष पाटीलची Inside Story, पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा कसा ठरला 'गोल्डन बॉय'
ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार ही देखील व्यावसायिक क्रिकेटपटू असून पुणेकर आहे. गणपतीमध्ये दगडूशेठचं दर्शन ठरलेलं असतं असं तिनं यावेळी सांगितलं. दगडूशेठ गणपतीचे दर्शन मिळाल्याने मन प्रसन्न झालं असून खूप दिवसांनी गणपती उत्सव सुरु असताना बाप्पाचं दर्शन घेण्याचा योग आला. मी पुढच्यावर्षीही गणेशोत्सवाच्या दरम्यान इथं येण्याचा प्रयत्न करेन, अशी भावना ऋतुराजनं व्यक्त केली. ऋतुराजला पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी जमली होती.
धोनीचा चेला ते टीम इंडियाचा कॅप्टन
ऋतुराज गायकवाड हा पुणेकर आणि महाराष्ट्राचा खेळाडू आहे. त्याला खरी ओळख इंडियन प्रीमियर लीगमधून मिळाली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स टीमचा तो महत्त्वाचा सदस्य आहे. आयपीएल 2021 मध्ये त्यानं 16 मॅचमध्ये 635 रन करत ऑरेंज कॅप मिळवली होती. सीएसकेच्या त्या वर्षीच्या विजेतपदात ऋतुराजचा महत्त्वाचा वाटा होता.
Asian Games : भारताच्या महिला क्रिकेट संघाला सुवर्ण, श्रीलंकेला हरवून घडवला इतिहास
सीएसकेनं यावर्षीही (IPL 2023) आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. या सिझनमध्येही ऋतुराजनं 147.50 च्या स्ट्राईक रेटनं 590 रन केलेत. चेन्नई सुपर किंग्सचा भावी कॅप्टन म्हणूनही त्याच्याकडं पाहिलं जातंय.
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर ऋतुराजची टीम इंडियामध्येही निवड झाली. त्यानं आजवर 4 वन-डेमध्ये 26.50 च्या सरासरीनं 106 तर 11 टी20 मध्ये 126.19 च्या स्ट्राईक रेटनं 212 रन केले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहालीमध्ये झालेल्या वन-डेमध्ये ऋतुराजनं हाफ सेंच्युरी झळकावली होती. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहेत.त्यावेळी चीनमधील एशियन गेम्ससाठी निवड झालेल्या तरुण टीमचा ऋतुराज कॅप्टन आहे. या स्पर्धेत गोल्ड मेडलची टीम इंडियाकडून अपेक्षा आहे.