खेळाडूंची दुबईमध्ये टेस्ट
बीसीसीआयने अलीकडेच टीम इंडियाच्या खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी ब्रॉन्को टेस्ट लागू केली आहे. टीम इंडियाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स यांनी यो-यो टेस्टसह ब्रॉन्को टेस्टची शिफारस केली होती. ही टेस्ट देण्यासाठी टीम इंडियाचे अनेक खेळाडू बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले होते. ही टेस्ट देण्यासाठी टीम इंडियाचे सगळे खेळाडू बंगळुरूला पोहोचल्याचं बोललं जात होतं, पण आता टीमच्या स्टार खेळाडूंची बंगळुरूमध्ये ब्रॉन्को टेस्ट झाली नसल्याचं समोर आलं आहे.
advertisement
आशिया कपसाठी निवडलेल्या खेळाडूंची ब्रॉन्को टेस्ट दुबईमध्येच घेतली जाऊ शकते. टीम इंडिया 4 सप्टेंबर रोजी दुबईला रवाना होईल, यानंतर 5 सप्टेंबर रोजी आयसीसीच्या अकादमीमध्ये खेळाडूंची ब्रॉन्को टेस्ट व्हायची शक्यता आहे. ब्रॉन्को टेस्टमध्ये, एका खेळाडूला 20 मीटर शटल रेसने सुरुवात करावी लागेल. त्यानंतर 40 मीटर आणि 60 मीटर शर्यत होईल. या सर्वांचा एकत्रितपणे एक सेट तयार केला जाईल. एका खेळाडूने असे पाच सेट (एकूण 1200 मीटर) न थांबता करावे अशी अपेक्षा आहे.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक
आशिया कप 2019 मध्ये एकूण 19 सामने होणार आहेत. टीम इंडियाला 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. त्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानशी सामना करेल. हा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर, भारतीय टीम 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना खेळेल. त्यानंतर सुपर-4 सामने खेळवले जातील. जिथे भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक लढत पाहायला मिळू शकते.