पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ९९ धावांवर आठ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मार्को जानसेन आणि कगिसो रबाडा यांनी ५१ धावांची नाबाद भागिदारी करत संघाला विजय मिळून दिला. रबाडाने नाबाद ३१ तर जानसेनने नाबाद १६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे भारतासाठी मोठी बातमी आली आहे. टीम इंडियाला आता WTCच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे नवे समीकरण समोर आले आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाकडून झाली मोठी चूक; भारताला हलक्यात घेतले, मेलबर्नवर इतिहास घडणार
WTCच्या फायनलमधील दुसऱ्या संघासाठी आता ३ संघात चुरस आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया,श्रीलंका आणि भारताचा समावेश आहे. WTCची फायनल ११ ते १५ जून या काळात लॉर्ड्सवर होणार आहे.
भारतासाठी WTC फायनलचे समीकरण...
- भारताला WTCच्या फायनलमध्ये सहजपणे पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही कसोटीत विजय मिळवावा लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी सुरू असून उद्या त्याचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर सिडनी येथे पाचवी कसोटी होईल. जर भारताने या दोनपैकी एक सामना ड्रॉ केला किंवा त्यांचा पराभव झाला तर त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले.
मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला किती ओव्हर्स मिळणार?
- जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ने जिंकली तर टीम इंडियाला आशा करावी लागेल की श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील किमान एक मॅच ड्रॉ करावी.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली तर भारताची टक्केवारी ५५.२६ इतकी होईल. आणि अशा परिस्थितीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-० किंवा २-०ने जिंकणे गरजेचे ठरले.
- मेलबर्न आणि सिडनी कसोटी ड्रॉ झाली तर भारताच्या विजयाची टक्केवारी ५३.५१ इतकी होईल. अशा परिस्थिती श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-० ने जिंकली किंवा ०-० अशी बरोबरीत सोडवली भारत फायनलमध्ये पोहोचेल. कारण या परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलियाची टक्केवारी समान म्हणजे ५३.५१ इतकी होईल. आयसीसीच्या निमानुसार भारताने सर्वाधिक मालिका जिंकल्यामुळे ते फायनलमध्ये पोहोचतील. जर लंकेने मालिका २-० ने जिंकली तर ते भारताच्या पुढे जातील.
- ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने १-२ अशी गमावली तर ते फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील.
