टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेच्या 49 दिवस आधीच बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. गिल टीममधून बाहेर झाल्यामुळे आता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात ओपनर म्हणून मैदानात उतरलेले अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन वर्ल्ड कपमध्येही ओपनिंग करतील, तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव खेळेल.
advertisement
प्लेइंग इलेव्हनमध्ये किती ऑलराऊंडर?
टीमचा उपकर्णधार अक्षर पटेल, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या हे ऑलराऊंडरही प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील. अक्षर पटेल डावखुरा स्पिनर तर हार्दिक आणि शिवम दुबे मीडियम फास्ट बॉलिंगही करतील. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग टीमचे पहिल्या पसंतीचे दोन फास्ट बॉलर असतील.
किती स्पिनरना संधी?
भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनर म्हणून वरुण चक्रवर्ती असेल, याशिवाय अक्षर पटेल, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा हेदेखील स्पिन बॉलिंगसाठी पर्याय आहेत. भारतीय निवड समितीने वर्ल्ड कपसाठी 15 जणांची मजबूत टीम निवडली आहे, ज्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांना ऑलराऊंडरचे बरेच पर्याय मिळाले आहेत.
वर्ल्ड कपसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट कीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
टी-20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट कीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन
