तिलक वर्मा रिटायर्ड आऊट का झाला?
"पांड्याचा कठोर वाटणारा निर्णय केवळ त्याच्या बोटातील दुखापतीमुळे घेण्यात आला होता. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. म्हणूनच त्याला पुन्हा डगआउटमध्ये बोलावण्यात आलं. दुखापतीमुळे तो पॉवरने हिटिंग करु शकत नव्हता. हेच कारण आहे की तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. तिलकच्या फटके मारण्याच्या क्षमतेवर संघात शंका नाही," असं एका सूत्राने शनिवारी TOI ला सांगितलं.
advertisement
नेमकं काय झालं होतं?
सामन्याच्या 19 व्या ओव्हरमध्ये मुंबई संघाने तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा संघाला फायदा झाला नाही. तिलकने 23 चेंडूत 25 धावा केल्या. 19 व्या ओव्हरमध्ये पहिल्या पाच चेंडूत शार्दुलने फक्त पाच धावा दिल्या, त्यानंतर मुंबई संघाने तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला 22 धावांची आवश्यकता होती. मात्र, पांड्याला मुंबईला विजय मिळवून देता आला नाही.
खरं कारण का सांगितलं नाही?
दरम्यान, आम्हाला सामना जिंकण्यासाठी काही मोठ्या हिट्सची गरज होती, त्याला ते मिळत नव्हतं. क्रिकेटमध्ये असे काही दिवस येतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण ते मिळत नाहीत. चांगले क्रिकेट खेळा, मला ते सोपं ठेवायला आवडतं. चांगले निर्णय घे तर काम सोपं होतं, असं हार्दिक पांड्या म्हणाला होता. मात्र, मुंबईने तिलकच्या दुखापतीचं खरं कारण का सांगितलं नाही? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.