टीम इंडिया इंग्लंडविरूद्ध टेस्ट मालिकेत व्यस्त असताना मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू तिलक वर्मा इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियन्सशीप खेळत आहे. या स्पर्धेत हॅम्पशायर संघाकडून सामना खेळत आहे.या संघाकडून खेळताना तिलक वर्माने शानदार शतक ठोकलं आहे.
एसेक्सविरुद्धच्या पहिल्या डावात तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या संघाने पहिल्या 2 विकेट फक्त 34 धावांवर गमावल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर तिलक वर्मा यांनी खूप संयमाने फलंदाजी केली. तिलक वर्मा हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो,परंतु त्याच्या खेळीतून हे दिसून आले की गरज पडल्यास तो संयमानेही खेळू शकतो आणि त्याने तेच दाखवून दिले.
पहिल्या डावात तिलक वर्माने आपल्या संघासाठी शतक झळकावले आणि त्याने 239 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. या डावात त्याने 241 बॉल खेळले असले तरी तो 100 धावांवर बाद झाला. तिलकने या डावात 3
उत्कृष्ट षटकार आणि 11चौकार मारले. ब्रेन ब्राउनसोबत मिळून त्याने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची शतकी भागीदारी केली आणि संघाची धुरा सांभाळली.
तिलक वर्मा पहिल्यांदाच काउंटी चॅम्पियनशिपमध्ये संघाकडून खेळत आहे आणि हॅम्पशायरकडून खेळताना त्याने इंग्लंडच्या भूमीवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. या सामन्याद्वारे त्याने हॅम्पशायरकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले. एकूणच, त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. तिलकने आतापर्यंत भारतासाठी 4 एकदिवसीय आणि 25 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिलक वर्मा यांना अद्याप भारतासाठी कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही.