हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा आहे. तिलक वर्मा हा हॅम्पशायर संघाकडून काउंटी चॅम्पियन्सशीप खेळत आहे.या स्पर्धेत हॅम्पशायर विरूद्ध वॉर्सेस्टरशायर यांच्यात सामना सूरू आहे. या सामन्यात तिलक वर्माने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली.
दरम्यान याआधी एसेक्सविरूद्ध खेळताना पहिल्या डावात तिलक वर्माने आपल्या संघासाठी शतक झळकावले होते. त्याने 239 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. या डावात त्याने 241 बॉल खेळले असले तरी तो 100 धावांवर बाद झाला. तिलकने या डावात 3 उत्कृष्ट षटकार आणि 11चौकार मारले. ब्रेन ब्राउनसोबत मिळून त्याने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची शतकी भागीदारी केली होती.
advertisement
दरम्यान या सामन्यात वॉर्सेस्टरशायरने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 679 धावा केल्या आहेत. त्यानंतर हॅम्पशायर पहिल्या डावात 221 धावांवर ऑलआऊट झाला. या डावात तिलक वर्माने सर्वाधिक अर्धशतकीय खेळी केली होती. आता वॉर्सेस्टरशायरने हॅम्पशायरला फॉलोऑन दिले आहे.त्यामुळे हॅम्पशायर जिंकण्यासाठी आता 458 धावांची गरज आहे.
तिलक वर्माची काऊंटी स्पर्धेतील ही कामगिरी पाहता त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.