या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 352 रन केले. विहान मल्होत्राने नाबाद 109 रनची खेळी केली, तर अभिज्ञान कुंडूने 61 आणि वैभव सूर्यवंशीने 52 रन केले. शतकी खेळीबद्दल विहान मल्होत्राला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. विहान मल्होत्राने 107 बॉलमध्ये 7 फोरच्या मदतीने नाबाद 109 रन केले. तर वैभव सूर्यवंशीने त्याच्या 30 बॉलच्या खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स लगावल्या. 130 रनवरच भारताने 4 विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे टीम अडचणीत सापडली होती, पण विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी भारताला अडचणीतून बाहेर काढत, मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं.
advertisement
झिम्बाब्वेविरुद्धचा टीम इंडियाचा सुपर सिक्समधला हा पहिल्या सामन्यातला पहिला विजय आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये भारताने 3 पैकी 3 सामने जिंकले होते. सुपर सिक्स स्टेजमध्ये भारताच्या ग्रुपमध्ये झिम्बाब्वेसह इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड या टीम आहेत. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना 1 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
