TRENDING:

VIDEO : आयपीएल संपलं तरी पठ्ठ्याची बॅट काय थांबेना, 14 वर्षांच्या वैभवने पुन्हा पाडला धावांचा पाऊस

Last Updated:

अशाच एका खेळाडूची आता आयपीएलच्या समाप्तीनंतर बॅट तळपली आहे. 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीने आता पुन्हा धावांचा पाऊस पाडला आहे. या संदर्भातला आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Suryavashi Video : आयपीएल संपूष्ठात आल्यानंतर विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहे, तर भारतीय खेळाडू आपआपल्या घरी गेले आहेत. यामधील काही खेळाडूंनी स्पर्धेच्या समाप्तीनंतर लगेचच दुसऱ्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अशाच एका खेळाडूची आता आयपीएलच्या समाप्तीनंतर बॅट तळपली आहे. 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीने आता पुन्हा धावांचा पाऊस पाडला आहे. या संदर्भातला आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
vaibhav suryavanshi hits sixes
vaibhav suryavanshi hits sixes
advertisement

खरं तर आयपीएलमध्ये 14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीला राजस्थानच्या संघात खूप उशीरा साथ मिळाली. मात्र यानंतर देखील त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. ही चमक त्याने शेवटपर्यंत टीकून ठेवली होती. पण आता आयपीएलच्या समाप्तीनंतरही वैभव सुर्यवंशीची बॅट तळपली आहे. कारण वैभव सुर्यवंशीने पुन्हा धावांचा पाऊस पाडला आहे.

सोशल मीडियावर सध्या वैभव सुर्यवंशीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओत वैभव सुर्यवंशी गोलंदाजांची धुलाई करून आक्रामक फलंदाजी करताना दिसला आहे. एनसीए अंडर 19 कॅम्पचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत सुर्यवंशी आयपीएलसारखीच फलंदाजी करताना दिसला आहे

दरम्यान वैभव सुर्यवंशीने 2025च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सात सामन्यांमध्ये 206.55च्या स्ट्राईक रेटने एकूण 252 धावा काढल्या आणि सुपरस्ट्रायकर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळवला आहे.

advertisement

वैभव सुर्यवंशीचे रेकॉर्ड 

वैभवने वयाच्या 14 वर्षे आणि 23 दिवसांत आयपीएलमध्ये पदार्पण केले, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. त्याने प्रयास रे बर्मन याचा रेकॉर्ड मोडला, ज्याने 16 वर्षे आणि 157 दिवसांत पदार्पण केले होते.

19 एप्रिल 2025 रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये वैभवने आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. हा सामना त्याने 20 चेंडूत 34 धावा केल्या.

advertisement

28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 35 चेंडूत शतक झळकावले, जे आयपीएलमधील दुसरे सर्वात वेगवान शतक आणि भारतीय खेळाडूकडून सर्वात वेगवान शतक आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 11 षटकार मारले, ज्यामुळे त्याने मुरली विजय याच्या एका डावातील सर्वाधिक 11 षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली. यासह तो टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.

advertisement

वैभवने 7 सामन्यांत 24 षटकार मारले. जर त्याने सर्व 14 सामने खेळले असते, तर तो 48-50 षटकारांसह अभिषेक शर्मा याच्या एका हंगामातील 42 षटकारांच्या भारतीय विक्रमाला मागे टाकू शकला असता.

वैभवने 20 वर्षांखालील खेळाडूंमध्ये आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : आयपीएल संपलं तरी पठ्ठ्याची बॅट काय थांबेना, 14 वर्षांच्या वैभवने पुन्हा पाडला धावांचा पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल