TRENDING:

Vaibhav Suryavashi : असा खेळाडू मी आयुष्यात...वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडच्या स्टार खेळाडूने केलं कोतुक

Last Updated:

वैभवच्या फलंदाजीची तुलना भारतीय महान फलंदाज युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध ब्रायन लारा यांच्याशी केली आहे. वैभवच्या बॅटीची स्विंग त्या दिग्गजांइतकीच उत्कृष्ट आणि क्लासिक आहे, असे बटलरने सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jose buttler on Vaibhav Suryavanshi : टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीच्या आयपीएल पदार्पणानंतर त्याचं कौतुक काय थांबायचं नाव घेत नाही आहे. कारण जो तो येतोय वैभवच्या फलंदाजीचं कौतुक करतोय, आता इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलरने वैभव सुर्यवंशीच कौतुक केलं आहे.हा मुलगा मी पाहिलेला सर्वात प्रभावी खेळाडू आहे, असे कौतुक जोस बटलरने केले आहे.
Vaibhav Suryavashi
Vaibhav Suryavashi
advertisement

इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जोस बटलरने राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीबद्दल मोठे विधान केले आहे. बटलरने वैभवच्या फलंदाजीची तुलना भारतीय महान फलंदाज युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध ब्रायन लारा यांच्याशी केली आहे. वैभवच्या बॅटीची स्विंग त्या

दिग्गजांइतकीच उत्कृष्ट आणि क्लासिक आहे, असे बटलरने सांगितले.

जॉस बटलरने स्टुअर्ट ब्रॉडसोबतच्या पॉडकास्टमध्ये वैभवच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.यावेळी बटलर म्हणाला की, क्रीजवर येताच त्याने पहिल्याच चेंडूवर लाँग-ऑफवर एक शानदार षटकार मारला. त्याने त्याच्या पदार्पणाच्या डावात 20 चेंडूत 34 धावा केल्या. या स्फोटक सुरुवातीमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली.

advertisement

हा प्रसंग आठवून स्टुअर्ट ब्रॉडने बटलरला सांगितले की, जेव्हा मी पाहिले की राजस्थान रॉयल्सने यावेळी लिलावात त्यांच्या संघात 14 वर्षांचा खेळाडू खरेदी केला आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले. हे व्यावसायिक क्रिकेट आहे आणि तो फक्त 14 वर्षांचा आहे. जेव्हा त्याने शतक केले तेव्हा मला आठवते की तू विकेटकीपिंग करत होतास आणि त्याच्या शतकाची जगभरात चर्चा झाली होती, म्हणून मला त्या शतकाबद्दल जरा सांग.

advertisement

28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना वैभवने आयपीएलमधील सर्वात जलद शतकांपैकी एक ठोकले.वैभवने फक्त 35 चेंडूत शतक ठोकले आणि 38 चेंडूत 101 धावा केल्या. त्याच्या शानदार खेळीत मोठे षटकार होते आणि त्याने मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद खान सारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना चौकाराबाहेर पाठवले.

जोस बटलर म्हणाला, "हा मुलगा माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहे आणि तो मैदानात आम्हाला सर्वत्र मारत आहे. तो फक्त षटकार मारत होता आणि तेही खूप मोठे षटकार. वैभव कोणत्याही सामान्य गोलंदाजाला मारत नव्हता, तर जगातील सर्वोत्तम टी20 गोलंदाज रशीद खानला मैदानात मारत होता. तो अशा घातक गोलंदाजांना त्याच्या मनाप्रमाणे षटकार मारत होता, कधीकधी त्यांच्याविरुद्ध इतक्या सहजपणे धावा काढत होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले.

advertisement

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, वैभवने रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन सारख्या अनुभवी गोलंदाजांविरुद्धही सहज धावा केल्या. एका शॉटवर, त्याने चेंडू कव्हरमध्ये मारला आणि नंतर आत्मविश्वासाने नॉन-स्ट्रायकर एंडकडे गेला. त्या डावाची आठवण करून देताना बटलर म्हणाला, "मी टीव्हीवर त्याचा सामना आणि विशेषतः त्याची फलंदाजी काळजीपूर्वक पाहत होतो आणि विचार करत होतो की, हा मुलगा मी पाहिलेला सर्वात प्रभावी खेळाडू आहे, असे जोस बटलर म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavashi : असा खेळाडू मी आयुष्यात...वैभव सूर्यवंशीचं इंग्लंडच्या स्टार खेळाडूने केलं कोतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल