खरं तर पदुचेरीने दिलेल्या 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरलाकडून संजू सॅमसन आणि रोहित कुनुमवाल स्वस्तात माघारी परतले होते.त्यानंतर बाबा अपराजीत आणि विष्णु विनोदने केरलाचा डावा सावरला होता. या दरम्यान बाबा अपराजीतने 63 धावांची नाबाद खेळी केली होती. तर विष्णू विनोदने 84 बॉलमध्ये 162 धावांची नाबाद दीड शतकीय खेळी केली होती.या खेळीत त्याने 14 सिक्स तर 13 बाऊन्ड्री मारल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 192 इतका होता.
advertisement
या दोन्ही खेळाड़ूंच्या वादळी खेळीच्या बळावर केरलाने 29 ओव्हरमध्ये म्हणजेच 174 बॉलमध्ये 252 धावा करून हे लक्ष्य गाठत 8 विकेटस राखून हा सामना जिंकला आहे. पदुचेरीकडून भुपेंद्र चव्हाण आणि पार्थ वघानीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
दरम्यान पदुच्चेरी प्रथम फलंदाजी करताना 47.4 ओव्हरमध्ये 247 धावांवर ऑल आऊट झाला होता. पदुच्चेरीकडून अजय रोहेराने 53 धावांची अर्धशतकीय आणि जशवंत श्रीरामने 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. केरलाकडून एमडी निधीशने 4, इडेन अॅप्पल टॉम आणि अंकित शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतली होती, बिजू नारायण आणि बाबा अपराजिताने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
