ई साला कप नमदू - विजय मल्ल्या
विजय मल्ल्या याने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून आरसीबीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. त्यानं म्हटलं आहे की, "आरसीबी अखेर 18 वर्षांनंतर आयपीएल चॅम्पियन बनले आहेत. 2025 च्या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलं. एक संतुलित संघ, 'प्लेइंग बोल्ड' (Playing Bold) या मंत्रावर विश्वास ठेवत, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सपोर्ट स्टाफच्या मदतीने त्यांनी ही कामगिरी केली. खूप खूप अभिनंदन! ई साला कप नमदे !!"
advertisement
पाहा पोस्ट
जेव्हा मी आरसीबीची स्थापना केली तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएल ट्रॉफी बेंगळुरूला यावी. मला तरुणपणी महान किंग कोहलीची निवड करण्याचे सौभाग्य मिळाले आणि तो १८ वर्षे आरसीबीसोबत राहिला आहे हे उल्लेखनीय आहे. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिलेल्या मिस्टर ३६० एबी डिव्हिलर्सची निवड करण्याचा मानही मला मिळाला. शेवटी, आयपीएल ट्रॉफी बेंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते आयपीएल ट्रॉफीचे पात्र आहेत, असंही मल्ल्या म्हणाला.
विजय मल्ल्या हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाचे मूळ मालक होता, जेव्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची स्थापना 2008 मध्ये झाली. त्याने बंगळूरु फ्रँचायझी 111.6 दशलक्ष अमेरिकन डॉलरमध्ये विकत घेतली होती, ज्यामुळे ती त्यावेळी दुसरी सर्वात महागडी टीम बनली होती. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) चे तत्कालीन अध्यक्ष म्हणून मल्ल्या याने RCB च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
दरम्यान, विजय मल्ल्या आर्थिक अडचणी आणि कर्जाची परतफेड न केल्यामुळे मल्ल्या याला युनायटेड स्पिरिट्स आणि त्यानंतर RCB मधून बाहेर पडावे लागलं. २०१६ मध्ये, त्याने रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RCSPL) च्या संचालक पदाचा राजीनामा दिला. विजय मल्ल्या आता RCB च्या मालकीशी संबंधित नसले तरी, त्यांनी अलीकडेच (X वर) RCB च्या ऐतिहासिक IPL २०२५ च्या विजयानंतर आपला आनंद व्यक्त केला