विजय मल्ल्याला हवी होती मुंबईची टीम
मुंबई इंडियन्ससह एकूण तीन फ्रँचायझींसाठी बोली लावली होती. मात्र, ती मुकेश अंबानी यांनी विकत घेतली. विजय मल्ल्याने अखेर 2008 मध्ये आरसीबीला 112 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतलं होतं. त्याची किंमत सध्याच्या परिस्थितीत 600 कोटी रुपये आहे. मी आरसीबी फ्रँचायझीसाठी बोली लावली तेव्हा मला आयपीएल भारतीय क्रिकेटसाठी एक गेम-चेंजर म्हणून दिसलं. मी अखेर 112 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली, जी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बोली होती, असं विजय मल्ल्या म्हणाला.
advertisement
रॉयल चॅलेंजशी जोडली बंगळुरू टीम
माझे स्वप्न बंगळुरूच्या भावनेला मूर्त रूप देणारा संघ तयार करण्याचा होता. मला आरसीबी असा ब्रँड बनवायचा होता जो केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही ओळखला जातो. म्हणूनच मी ते रॉयल चॅलेंजशी जोडले आहे, जे आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मद्य ब्रँडपैकी एक आहे. जेणेकरून त्याला एक मजबूत ओळख मिळेल, असंही विजय मल्ल्या यावेळी म्हणाला.
विराट कोहलीला का घेतलं?
मी अशा खेळाडूंची निवड केली जे आरसीबीला एक पॉवर हाऊस बनवू शकतील. माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमान म्हणजे अंडर-19 वर्ल्ड कप संघातील तरुण विराट कोहलीचं सिलेक्शन... मला मनापासून वाटत होतं की तो खास आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर बोली लावली, असं विजय मल्ल्या म्हणाला.
RCB मध्ये हवेत चार खेळाडू
दरम्यान, विजय मल्ल्या याने यावेळी चार अशा खेळाडूंची नाव सांगितली, जे खेळाडू आरसीबीमध्ये हवे होते. आरसीबीसाठी काही खेळाडू निवडण्याची संधी आहे का, तर ते खेळाडू कोण असतील? असा सवाल विचारल्यावर मल्ल्याने जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल या चार खेळाडूंची नावं सांगितली.