जेमिमा रॉड्रिग्ज काय म्हणाली?
जेमिमाने एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटलं की, आम्हाला विराट कोहलीची भेट घ्यायची होती. मी आणि स्मृती मानधना मार्गदर्शनासाठी विराटकडे जाणार होतो. सुदैवाने टीम इंडियाचे महिला आणि पुरूष संघ एकाच हॉटेलमध्ये होते. त्यावेळी आम्ही विराटला त्याच हॉटेलमध्ये कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. विराट आणि अनुष्का कॅफेमध्ये होते. त्यावेळी आमचं बोलणं सुरू झालं. विराटने मला आणि स्मृतीला असं म्हटलं की, तुम्हा दोघींमध्ये महिला क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, आणि मला ते घडताना दिसते आहे. तुम्ही जो बदल घडवून आणाल तो मोठा असेल. त्यामुळे आणखी थोडा जोर द्या आणि चांगली कामगिरी करून दाखवा.
advertisement
कॅफेतील कर्मचाऱ्यांनी आम्हाला बाहेर काढलं
विराटने आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सुरुवातीला आम्ही क्रिकेटबद्दल बोलत होतो, नंतर आम्ही आयुष्याबद्दल गप्पा मारल्या. त्यावेळी आमच्या आरामात गप्पा चालल्या होत्या, जणू काही जुने मित्र फार दिवसानंतर भेटले आहेत. आम्ही एवढं गप्पा मारत होतो की, अखेर कॅफेतील कर्मचाऱ्यांनी आम्हाला बाहेर काढलं तेव्हा कुठं आमच्या गप्पा थांबल्या, असं जेमिमा म्हणाली. तब्बल चार तास आम्ही तिथंच होतो, अखेर त्यांनी आम्हाला बाहेर जाण्यास सांगितलं, असंही जेमिमा म्हणाली.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
दरम्यान, विराट आणि अनुष्काने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये इटलीमध्ये त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतरही ते दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. विराट क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स मोडत आहे, तर अनुष्का अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. ते दोघेही एकमेकांना पाठिंबा देतात. अनुष्का नेहमी क्रिकेट सामन्यात विराटला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित असते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही त्यांच्यातील प्रेम आणि आदर दिसून येतो.