TRENDING:

विराट-रोहितची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती? ICCचा चाहत्यांना धक्का, नेमकं काय घडलं?

Last Updated:

टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली यांना आयसीसीने मोठा झटका दिला आहे.या दोन्ही खेळाडूंची नाव आयसीसीने ताज्या वनडे रॅकींगमधून वगळली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
virat kohli rohit sharma icc odi ranking
virat kohli rohit sharma icc odi ranking
advertisement

Virat kohli and Rohit sharma name Remove ICC ODI Ranking : टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली यांना आयसीसीने मोठा झटका दिला आहे.या दोन्ही खेळाडूंची नाव आयसीसीने ताज्या वनडे रॅकींगमधून वगळली आहेत. खरं तर मागच्याच आठवड्यात रोहित शर्मा दुसऱ्या तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होता. पण नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवारीत या दोन्ही खेळाडूंची नावं वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान हे दोनही खेळाडू 2027 वर्ल्ड कप खेळणार होते. पण त्याआधी त्यांची नावे वगळण्यात आल्याने आता दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे.

advertisement

आयसीसीने नुकतीच वनडे रॅकिंग जारी केली आहे. या रॅकिंगमधील टॉप 10 मधून विराट कोहली आणि रोहित शर्माचं नाव गायब आहे. याआधी मागच्याच आठवड्यात टॉप 10 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नाव होती. त्यावेळेस फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्माने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत दुसरं स्थान गाठलं होतं. तर विराट कोहली क्रमवारीत चौथ्या स्थानावर होते. पण ताज्या क्रमवारीत दोन्ही खेळाडूंची नाव गायब आहेत.

advertisement

सध्या ताज्या आकडेवारीत दुसऱ्या स्थानावर बाबर आझम आहे.तर चौथ्या स्थानावर चरीत असलंका आहे. आता टॉप 10 मधून कोहिल आणि रोहित शर्माचं नाव आयसीसीने का वगळले आहे? यामागचा अर्थ काय आहे? या सगळ्या गोष्टींची उत्तर आयसीसीजवळ आहेत.

advertisement

आता या क्रमवारीवरून मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मागच्या क्रमवारीनंतर बाबर आझमने एकही सामना खेळलेला नाही आहे. अशापरिस्थितीत तो दुसऱ्या स्थानावर कसा पोहोचू शकतो. जरी असं मानलं की बाबर आझम दुसऱ्या स्थानी पोहोचला, मग रोहित शर्मा टॉप 10 मधून बाहेर कसा झाला? जर रोहितने एकही सामना खेळला नाही तर त्याची क्रमवारीत घसरण झाली असती. पण त्याला रॅकिंगमधून बाहेर करणे थोडंस संशयास्पद वाटतं. विशेष म्हणजे एकटा रोहित नव्हे तर त्याच्यासोबत विराट कोहलीचं नावही रॅकिंगमधून बाहेर आहे.

advertisement

दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दोन्ही खेळाडूंनी टी20 आणि टेस्ट या क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.आता हे दोन्ही खेळाडू वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना 2027चा वर्ल्ड कप देखील खेळायचा आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत दोन्ही खेळाडूंनी नाव वगळण्यात आल्याने दोन्ही खेळाडू निवृत्ती घेतायत की काय? अशी चर्चा सूरू झाली आहे.

आयसीसी वनडे रँकिंग (फलंदाजी)- 19 ऑगस्टपर्यंत

शुभमन गिल- 784- गुण

बाबर आझम- 739- गुण

डॅरिल मिचेल- 720- गुण

चरित अस्लंका- 719- गुण

हॅरी टेक्टर- 708- गुण

श्रेयस अय्यर- 704- गुण

शाई होप- 699- गुण

इब्राहिम झद्रान- 676- गुण

कुसल मेंडिस- 669- गुण

ट्रॅव्हिस हेड-648- गुण

आयसीसी वनडे रँकिंग (फलंदाजी)- (13 ऑगस्टपर्यंत)

शुभमन गिल भारत 784

रोहित शर्मा भारत 756

बाबर आझम पाकिस्तान 751

विराट कोहली भारत 736

डॅरिल मिशेल न्यूझीलंड 720

चरित असलंका श्रीलंका 719

हॅरी टेक्टर आयर्लंड 708

श्रेयस अय्यर भारत 704

इब्राहिम झद्रान अफगाणिस्तान 676

कुशल मेंडिस श्रीलंका 669

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराट-रोहितची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती? ICCचा चाहत्यांना धक्का, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल