विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये जाताना...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कोहलीचे शतक पाहून रोहित उत्साहित झाल्याचे आणि उभे राहून टाळ्या वाजवताना दिसत आहे. तर गंभीरने देखील खाली बसून का होईना टाळ्या वाजवल्या. मात्र, त्यानंतर टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये जात होता. त्यावेळी मात्र विराटने गंभीरला इग्नोर केल्याचं दिसून आलं. त्यामुळे टीम इंडियामध्ये सर्वकाही अलबेल नाही, असं चित्र स्पष्ट दिसत आहे.
advertisement
दणदणीत परफॉर्मन्सने टीकाकारांना केलं शांत
टेस्ट क्रिकेट आणि टी20 फॉर्मेटमधून रिटायर झाल्यानंतर कोहली आता फक्त एकाच फॉर्मेटचा भाग आहे. त्यामुळे तो भविष्यात खेळणार की नाही किंवा 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये तो सहभागी होऊ शकेल का, असे अनेक प्रश्न क्रिकेट जगतात वारंवार उपस्थित केले जातात. मात्र, या मॅचमध्ये त्याने केलेल्या दणदणीत परफॉर्मन्सने टीकाकारांना शांत केले आहे.
135 धावांची विस्फोटक इनिंग
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने रविवारी रांची येथे साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 3 मॅचच्या वनडे सीरीजमधील पहिल्या मॅचमध्ये आपल्यातील फायटरला बाहेर काढले. या लेजेंड खेळाडूने 120 बॉलचा सामना करत 11 फोर आणि 7 सिक्स च्या मदतीने 135 धावांची एक विस्फोटक इनिंग खेळली आणि आपल्या वनडे करिअरमधील 52 वे शतक पूर्ण केले. 37 वर्षांच्या या खेळाडूसाठी ही खेळी त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम इनिंग्सपैकी एक मानली जात आहे.
