52 वं एकदिवसीय शतक पूर्ण
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार 135 धावा केल्या. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर त्याने 52 वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं, तेव्हा अचानक एक चाहता सुरक्षा रक्षकांना तोडून मैदानात घुसला आणि कोहली त्याचं शतक साजरे करत असताना त्याच्या जवळ आला.
advertisement
विराटला भेटण्यासाठी धडपड
कोहलीने त्याला पायांना स्पर्श करण्यापासून रोखले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेचच चाहत्याला बाहेर काढले. ही घटना सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. पण विराटला भेटण्यासाठी त्याची धडपड पाहताना तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
10 फूट उंचीवरून मैदानावर उडी
विराटचा चाहता तो विंग ए मधून सामना पाहत होता. सर्वांचे लक्ष कोहलीच्या शतकावर होते आणि या संधीचा फायदा घेत तो सुमारे 10 फूट उंचीवरून मैदानावर उडी मारून थेट कोहलीच्या मैदानात धावला. काय चालले आहे हे कोणालाही समजण्यापूर्वीच तो कोहलीच्या पाया पडला. कोहलीने त्याला उचलले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याचा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाला.
