डावखुरा स्पिन बॉलर असलेल्या शाहबाज नदीम याने 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर 2021 साली नदीम इंग्लंडविरुद्ध त्याची शेवटची टेस्ट खेळला. या 2 सामन्यांमध्ये नदीमने 8 विकेट घेतल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये मात्र शाहबाज नदीमने 500 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. शाहबाज नदीमचा जन्म 12 ऑगस्ट 1989 साली बोकारोमध्ये झाला.
advertisement
15 वर्ष थांबल्यानंतर पहिली टेस्ट
शाहबाज नदीमने 2024 साली आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. फक्त 15 वर्षांचा असताना शाहबाजला रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर 30व्या वर्षी शाहबाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. योगायोगाने शाहबाज नदीमने त्याचं होम ग्राऊंड असलेल्या रांचीमधूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
प्रथम श्रेणीमध्ये 544 विकेट
शाहबाज नदीमच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 542 विकेट आहेत. झारखंडकडून शाहबाज नदीम 20 वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळला. तसंच आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजाएंट्स या टीममध्ये होता. नदीमच्या नावावर 72 आयपीएल सामन्यांमध्ये 48 विकेट आहेत.
RBI मध्ये नोकरी
शाहबाज नदीमला स्पोर्ट्स कोट्यामधून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली आहे. शाहबाजचे वडील जावेद महमूद काही वर्षांपूर्वीच डीएसपीच्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.