आशिया कप स्पर्धा दोनदा टी20 स्वरूपात खेळवण्यात आली आहे.त्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे.त्यामुळेच आशिया कपमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या स्थानावर आहे.
2016 मध्ये पहिल्यांदाच टी20 स्वरूपात आशिया कप आयोजित करण्यात आला होता आणि त्या हंगामात भारत विजेता ठरला होता.त्यानंतर 2023 मध्ये आशिया कप टी20 स्वरूपात खेळवण्यात आला होता आणि या हंगामात श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून विजेता होण्याचा मान मिळवला होता.आता 2025 मध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा टी20 स्वरूपात आयोजित केली जाणार आहे.
advertisement
आशिया कपच्या गेल्या दोन हंगामात, कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 10 सामन्यांमध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांसह एकूण 429 धावा केल्या आहेत, तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे.त्याने 6 सामन्यांमध्ये 281 धावा केल्या आहेत.या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्याने 9 सामन्यांमध्ये 271 धावा केल्या आहेत. तर बाबर या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.त्याने 5 सामन्यांमध्ये 235 धावा केल्या आहेत.तर इब्राहिम झद्रान पाचव्या क्रमांकावर आहे,त्याने 5 सामन्यांमध्ये 196 धावा केल्या आहेत.
टी20 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली- 429 धावा
मोहम्मद रिझवान- 281 धावा
रोहित शर्मा- 271 धावा
बाबर हयात- 235 धावा
इब्राहिम झदरान- 196 धावा