विराट कोहली सध्या लंडनमध्ये त्याच्या कुटुंबियासोबत आहे.या दरम्यान त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत विराट कोहलीने स्वेट शर्ट आणि काळी टोपी परिधान करत फॅन सोबत पोज दिला आहे. पण या फोटोत अनेकांना तो ओळखता येत नाही आहे.यामागचे कारण म्हणजे विराट कोहलीची दाढी.
फोटोमध्ये विराट कोहली खूपच म्हातारा वाटतोय.कारण त्याची दाढी पांढरीशु्भ्र झाली आहे. त्यामुळे तो ओळखता येत नाही आहे. त्यामुळेच त्याच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.दरम्यान या फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे.
advertisement
या फोटोच्या एक महिन्याआधी विराट कोहली विम्बल्डनचा अंतिम सामना पाहायला पोहोचला होता.या फोटोत त्याची दाढी काळी दिसत होती.पण या बरोबर एक महिन्यानंतर विराटची झालेली ही अवस्था पाहून अनेकांना झटका बसला आहे.
विराट कोहलीने मे महिन्यात टेस्टमधून रिटायरमेंट घेतली होती.त्यामुळेच तो इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेत खेळताना दिसला नव्हता. दरम्यान या रिटायरमेंटवर बोलताना तो म्हणाला, मी दोन दिवसापुर्वीच दाढी केली आहे.त्यामुळे तुम्हाला जर दर चार दिवसांनी दाढी करावी लागत असेल तर समजून जा तुमच्या आराम करायची वेळ आली आहे, असे म्हणत त्याने आपण आता थकलोय आणि म्हातार होत असल्याचे संकेत दिले होते.
दरम्यान विराट कोहली सध्या शेवटचा आयपीएलमध्ये झळकला होता. यावेळी विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरू संघाने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. यावेळी आरसीबी संघाने तब्बल 18 वर्षांचा दुष्काळ संपवत हा किताब पटकावला होता.
विराट कोहलीने 2024 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेआधी आयपीएल दरम्यान त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे विराट कोहली आता वनडे क्रिकेट या एकमेव फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.