विराट कोहली या महिन्याच्या सुरूवातीलाच इंग्लंडमधून भारतात परत आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये विराटची बॅट तळपली. या सीरिजनंतर विराट पुन्हा इंग्लंडला रवाना झाला, पण आता विजय हजारे ट्रॉफीसाठी विराट पुन्हा एकदा मुंबईत परत आला. मुंबईमध्ये आल्यानंतर विराट त्याच्या अलिबागच्या फार्म हाऊसवर गेला आणि तिथे त्याने प्रॅक्टिसला सुरूवात केली. विराट कोहलीच्या अलिबागमधल्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
विराटने टेस्ट आणि टी-20 टीममधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. 2027 चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी विराट तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या दोन वनडेमध्ये विराट शून्यवर आऊट झाला, त्यानंतर मात्र विराटने मागे वळून पाहिलं नाही. सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात विराटने नाबाद अर्धशतक केलं, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विराटने शतकं ठोकली. तर तिसऱ्या सामन्यात विराटने अर्धशतक केलं.
