TRENDING:

आधीच करिअर धोक्यात, त्यात उभं ठाकलं नवं संकट, विराट-रोहितला बसणार 440 व्होल्टचा झटका!

Last Updated:

टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे क्रिकेटमधल्या भविष्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे क्रिकेटमधल्या भविष्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विराट आणि रोहित वनडे क्रिकेट खेळणार का? याबाबतचा सस्पेन्स कायम असतानाच या दोघांना आणखी मोठा धक्का बसणार आहे. भारत सरकारने ऑनलाईन गेमिंग प्रमोशन ऍण्ड रेग्युलेशन विधेयक मंजूर केलं, त्यामुळे आता भारतामध्ये रियल मनी गेमिंग ऍपवर बंदी घालण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर होताच ड्रीम11 ने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपमधून माघार घेतली आहे.
आधीच करिअर धोक्यात, त्यात उभं ठाकलं नवं संकट, विराट-रोहितला बसणार 440 व्होल्टचा झटका!
आधीच करिअर धोक्यात, त्यात उभं ठाकलं नवं संकट, विराट-रोहितला बसणार 440 व्होल्टचा झटका!
advertisement

रियल मनी गेमिंग ऍपवर बंदी आणल्याचा फटका आता क्रिकेटपटूंनाही बसणार आहे, कारण आता त्यांची स्पॉन्सरशीपही धोक्यात येणार आहे. फॅन्टसी गेमिंग ऍपनी स्पॉन्सरशीप काढून घेतली तर भारतीय क्रिकेटपटूंची कमाई 20 ते 25 टक्के कमी व्हायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहित, विराटला धक्का

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या ड्रीम11 चा प्रचार करत होते. तर मोहम्मद सिराज शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, माय11 सर्कलच्या जाहिराती करतात. विराट कोहली एमपीएलसोबत जोडला गेला होता, तर एमएस धोनी विन्झोच्या जाहिराती करायचा. विराट कोहली जाहिरातींच्या माध्यमातून वर्षाला 175-200 कोटी रुपये कमावतो, पण एमपीएलसोबतचा करार संपुष्टात आला तर त्याचं 10-12 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. तर रोहितला 6-7 कोटींचं नुकसान होऊ शकतं.

advertisement

फॅन्टसी गेमिंग ऍपवरच्या या कारवाईमुळे भारतीय क्रिकेटपटूंचं जवळपास 100 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. मोहम्मद सिराजकडे याआधी 3 जाहिराती होत्या, ज्यातून आता माय11 सर्कल गेलं तर त्याच्या कमाईचा 33 टक्के हिस्सा जाणार आहे. वॉशिंग्टन सुंदरच्याबाबतीतही तेच होणार आहे.

आयपीएलच्या टीमनाही घाटा

दुसरीकडे खेळाडूंशिवाय आयपीएलच्या टीमनाही यामुळे घाटा होणार आहे. माय11 सर्कल आयपीएलचं असोसिएट स्पॉन्सर होतं, ज्यातून बीसीसीआय 125 कोटी रुपये कमवत होतं. माय11 सर्कलचा आयपीएलसोबतचा करार 5 वर्षांचा होता, ज्याची 3 वर्ष शिल्लक होती. याशिवाय केकेआर, लखनऊ आणि हैदराबादच्या टीमचंही जवळपास 10-20 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आधीच करिअर धोक्यात, त्यात उभं ठाकलं नवं संकट, विराट-रोहितला बसणार 440 व्होल्टचा झटका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल