माझं हृदय बंगळूरुसोबत - विराट कोहली
"मी या संघाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहे, काहीवेळा मला वेगळा विचार करावासा वाटला असला तरी, मी या संघाला चिकटून राहिलो. मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले. मी नेहमी त्यांच्यासोबत (RCB सोबत) जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं, आणि हे इतर कोणत्याही संघासोबत जिंकण्यापेक्षा खूप खास आहे, कारण माझं हृदय बंगळूरुसोबत आहे, माझा आत्मा बंगळूरुसोबत आहे.", असं विराट कोहली म्हणाला.
advertisement
मी एका लहान मुलासारखा झोपी जाईन - विराट
मी IPL खेळतो तोपर्यंत या संघासाठीच खेळणार आहे, त्यामुळे हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असंही विराट म्हणाला. तुम्ही एक खेळाडू म्हणून जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असता आणि ही एक खूप उच्च तीव्रतेची आणि उच्च गुणवत्तेची स्पर्धा आहे ज्याला आज जागतिक क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. आणि मी असा व्यक्ती आहे ज्याला मोठ्या स्पर्धा, मोठे क्षण जिंकायचे आहेत. आणि हा (IPL ट्रॉफी) क्षण माझ्या आयुष्यात नव्हता, पण आज रात्री, मी एका लहान मुलासारखा झोपी जाईन.", असं विराट म्हणाला.
18 वर्षात खूप काही गोष्टी ऐकल्या...
दरम्यान, गेल्या 18 वर्षात मी खूप काही गोष्टी ऐकल्या आहेत. पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि आज आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळतंय, असं विराट म्हणाला. मला घरी बसून हे म्हणायचं आहे की, मी माझ्याकडे जे काही होतं ते सर्व दिलं, असंही विराट म्हणालाय.