काय काय म्हणाला विराट कोहली?
चाहत्यांचे आभार मानताना विराट भावूक झाला. त्याने म्हटले, "हा विजय RCB च्या त्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमच्या सर्वात वाईट काळातही आमची साथ कधीही सोडली नाही. हा विजय अनेक वर्षांच्या हृदयभंगासाठी आणि निराशेसाठी आहे." मैदानावर दिलेल्या प्रत्येक प्रयत्नाचा उल्लेख करत कोहली म्हणाला, "या संघासाठी मैदानावर दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी हा विजय आहे."
advertisement
आयपीएल ट्रॉफीला म्हणाला...
सर्वात शेवटी, IPL ट्रॉफीबद्दल बोलताना कोहलीने आपली दीर्घकाळची प्रतीक्षा व्यक्त केली. "IPL ट्रॉफीबद्दल बोलायचं तर – मला तुला उचलता यावं आणि तुझ्यासोबत जल्लोष करता यावा यासाठी तू मला 18 वर्षे वाट पाहायला लावलीस मित्रा, पण ही वाट पाहणे पूर्णपणे सार्थकी लागले आहे," असंही विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीच्या या इन्स्टाग्राम पोस्टने पुन्हा एकदा त्याचे RCB आणि चाहत्यांशी असलेले अतूट नाते दर्शवले आहे. हा विजय केवळ संघासाठीच नव्हे, तर वर्षानुवर्षे संघास पाठिंबा देणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांसाठीही किती महत्त्वाचा आहे, हे त्याच्या शब्दांतून स्पष्ट झालंय.
विराट कोहलीचा कामगिरी
दरम्यान, आयपीएल 2025 चा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) साठी ऐतिहासिक ठरला, कारण त्यांनी अखेर आपले पहिले विजेतेपद पटकावले. या विजयात संघाचा कर्णधार विराट कोहली याची कामगिरी अत्यंत निर्णायक ठरली. संपूर्ण हंगामात त्याने फलंदाजीमध्ये सातत्य राखले आणि संघाला अनेक महत्त्वाच्या क्षणी आधार दिला. या हंगामात कोहलीने 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सरासरी 54.75 होती आणि स्ट्राइक रेट 144.71 होता. त्याने या हंगामात आठ अर्धशतके झळकावली