खर तर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. शनिवारी विराट कोहलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.ज्यामध्ये तो लॉर्ड्सवर खूप मेहनत करताना दिसतो. यादरम्यान तो चाहत्यांना भेटतानाही दिसला.त्यामुळे यावरून एक गोष्ट स्पष्ट होतेय. विराट कोहलीने आतापासूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारीला सूरूवात केली आहे. त्यामुळे कोहलीची ही तयारी पाहता बीसीसीआय टेन्शनमध्ये आली आहे.
advertisement
कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला स्टार फलंदाज विराट कोहली आता त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुढील एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा देखील खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यासाठी दोन्ही दिग्गजांनी सराव सुरू केला आहे.
अलिकडेच उत्तर प्रदेशचा उजव्या हाताचा फलंदाज स्वस्तिक चिकारा याने विराट कोहलीच्या क्रिकेट भविष्याबद्दल चर्चा केली होती.रेव्हस्पोर्ट्सशी झालेल्या चर्चेदरम्यान चिकारा म्हणाला, 'विराट भैय्याने म्हटले होते की मी पूर्णपणे तंदुरुस्त असेपर्यंत क्रिकेट खेळेन. मी प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळणार नाही. मी सिंहासारखा खेळेन. मी संपूर्ण २० षटके क्षेत्ररक्षण करेन आणि नंतर फलंदाजी करेन. ज्या दिवशी मला प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळायचे असेल, तेव्हा मी क्रिकेट सोडेन.
रोहितकडूनही सरावाला सूरूवात
19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करण्यासाठी हिटमॅन रोहितने तीन अनधिकृत वनडे सामन्यांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया सीरिजला फिट होण्यासाठी रोहितने एक महिना आधीच सराव सुरू केला होता, पण मॅच प्रॅक्टिससाठी तो ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळू इच्छितो जेणेकरून तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चांगली तयारी करू शकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही वनडे सीरिज रोहितची शेवटची सीरिज ठरू शकते, अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत, पण यावर बीसीसीआय किंवा रोहित शर्माकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.