काही महिन्यांपूर्वी, विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीमुळे अनेकांना धक्का बसला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर विराट निवृत्त होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर इंग्लंड दौऱ्याच्या एक महिना आधी कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने मात्र विराटच्या निवृत्तीबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे.
विराट कोहली आणखी 3-4 वर्ष खेळू शकला असता. कोहलीच्या फिटनेसचा प्रश्न नव्हता, हे सगळ्यांना माहिती आहे. विराटच्या बॅटमधून रन कमी झाल्या होत्या हे मान्य आहे, पण यश त्याच्या जवळ होतं. विराट आणखी तीन ते चार वर्ष खेळू शकला असता, माझ्यासह अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी हे धक्कादायक होते. विराट खूप फिट आहे, तसंच तो इंग्लंड सीरिजसाठी स्वतःला तयार करत होता, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.
advertisement
ड्रेसिंग रूममधील वातावरण खराब!
पडद्यामागे काहीतरी घडलं आहे, पण विराट याबद्दल काही उघड करणार नाही, असा मनोज तिवारीला वाटत आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही ठीक नाही. काय झालं हे मला माहिती नाही, पण कोहलीचं जाणं हे आतल्या गोष्टींमुळे असेल. फक्त तोच याबद्दल सांगू शकतो, पण मला वाटते की तो कधीही सार्वजनिक व्यासपीठावर हे बोलणार नाही. मला वाटत नाही की तो कधीही पुढे येऊन पडद्यामागे काय घडलं, ते सांगेल. पण तो ज्या वातावरणात खेळत होता, ते त्याला आवडलं नाही, असं मला वाटत आहे, असं वक्तव्य मनोज तिवारीने केलं आहे.