भारत आणि बांगलादेशमधील संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेले आहेत. बांगलादेशमध्ये दोन हिंदू तरुणांच्या हत्येमुळे ही परिस्थिती आणखी चिघळली, ज्यामुळे भारतात निदर्शने सुरू झाली. शेजारील देशात अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या आणखी घटना समोर आल्या. यानंतर, बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटी रुपयांना खरेदी केल्याबद्दल केकेआर आणि टीम मालक शाहरुख खानला भारतात टीकेला सामोरे जावे लागले.
advertisement
वाढत्या निषेधानंतर, बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजूर रहमानला सोडण्याचे निर्देश दिले. केकेआरने एका निवेदनात जाहीर केले की ते येत्या काही दिवसांत बदली खेळाडूची घोषणा करेल. पण, यानंतर बांगलादेशनेही निषेधार्थ अनेक पावले उचलली.
बांगलादेश सरकारने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केलेल्या मागणीत त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत होणार आहे, पण बांगलादेशचे सर्व सामने भारतात होणार आहेत. बीसीबीच्या मागणीवर अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी, आयसीसी स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्यास नकार देईल हे स्पष्ट आहे. बांगलादेश त्यांचे ग्रुप स्टेजमधील तीन सामने कोलकाता आणि एक सामना मुंबईमध्ये खेळेल.
बांगलादेशने माघार घेतली तर काय?
जर बांगलादेशने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या जागी दुसरी टीम समाविष्ट केला जाऊ शकतो. 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली होती, जेव्हा ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला जाण्यास नकार दिला होता. यानंतर आयर्लंड ऑस्ट्रेलियाच्या जागी खेळला होता. पण, बांगलादेशने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. केकेआरने मुस्तफिजूर रहमानला रिजील केल्यानंतरच टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेश टीम जाहीर करण्यात आली. आता 10 तारखेला आयसीसीच्या निर्णयानंतरच बांगलादेश टी-20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? हे स्पष्ट होईल.
