सदाशिव भोपळे यांनी जूनमध्ये अद्रक लागवड केल्यापासून ते काढणीला येईपर्यंत जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. सुरुवातीच्या वेळेला नांगरणी केली, त्यानंतर सहा ट्रॉली शेणखत टाकण्यात आले, रोट्या करण्यात आल्या तसेच बेड पाडले आणि कोंबडी खत यासह विविध खतांचा भेसळ डोस जमिनीत टाकून अद्रकीची लागवड केली. लागवड केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये वॉटर सोल्युबल, रासायनिक खत, फवारण्या केल्या आहेत. अद्रक पिकाला पाण्याची व्यवस्था म्हणून ठिबकने पाणी दिले जाते.
advertisement
भुईमूग पीक येईल जोमात, भरघोस उत्पादन वाढीसाठी अशी घ्या काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
सध्या अद्रक उत्पादन काढणीचा कालावधी असल्यामुळे जवळपास 70 जणांना या पिकाची काढणी होईपर्यंत म्हणजे जवळपास दोन ते तीन दिवस रोजगार प्राप्त झाल्याने कामगार देखील समाधान व्यक्त करत आहेत. तसेच तरुण आणि इतर शेतकऱ्यांना देखील अद्रक शेतीत यावे, मात्र यामध्ये वेळेचे गणित अचूक लागते तेव्हाच हे पीक फायदेशीर ठरते. अद्रकीचे उत्पादन आणि चांगले उत्पन्न घेण्यासाठी मुख्यतः बुरशीनाशक फवारणी, कीटकनाशक, या सर्व बाबी वेळोवेळी देणे गरजेचे असल्याचे देखील भोपळे यांनी म्हटले आहे.





