विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सीरिज शेवटची ठरू शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच रोहित आणि विराटला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरही वनडे क्रिकेट खेळायचं असेल, तर त्यांना डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावं लागेल, अशी अट बीसीसीआयने टाकल्याचं वृत्त होतं. आता खुद्द बीसीसीआयने या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
BCCI ने दिलं स्पष्टीकरण
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधल्या भविष्याबाबत कोणतीही चर्चा नाही, तसंच बीसीसीआयलाही त्यांच्या वनडे क्रिकेटमधल्या भविष्याबाबत निर्णय घ्यायची घाई नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे.
टीम इंडिया खेळणार 24 वनडे
2027 च्या वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया 24 वनडे खेळणार आहे. यातल्या 6 वनडे सीरिज घरच्या मैदानावर तर 2 वनडे सीरिज परदेशात होणार आहेत. 2027 चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवला जाणार आहे.
भारताच्या वनडे सीरिज
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (3 वनडे)- ऑस्ट्रेलियामध्ये
नोव्हेंबर-डिसेंबर 2025 - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (3 वनडे)- भारतात
जानेवारी 2026- भारत विरुद्ध न्यूझीलंड (3 वनडे)- भारतात
जून 2026- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 वनडे)- भारतात
जुलै 2026- भारत विरुद्ध इंग्लंड (3 वनडे)- इंग्लंडमध्ये
सप्टेंबर-ऑक्टोबर 2026- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (3 वनडे)- भारतात
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026- भारत विरुद्ध न्यूझीलंड (3 वनडे)- भारतात
डिसेंबर 2026- भारत विरुद्ध श्रीलंका (3 वनडे)- भारतात