6-0 चे इशारे करून भारताला चिडवणाऱ्या पाकिस्तानची महिला वर्ल्ड कपमधली अवस्था 7-0 अशी झाली आहे. महिला वर्ल्ड कपच्या 7 सामन्यांमध्ये पाकिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानने या स्पर्धेत 7 सामने खेळले, ज्यात 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला तर 3 सामने पावसामुळे रद्द झाले. यंदाच्या महिला वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न जिंकण्याचा लाजिरवाणा विक्रमही पाकिस्तानच्या नावावर झाला आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न जिंकणारी पाकिस्तान एकमेव टीम ठरली आहे. पॉईंट्स टेबलमध्येही पाकिस्तानने सातवा म्हणजेच शेवटून दुसरा क्रमांक मिळवला आहे. महिला वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानचा भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला.
advertisement
सेमी फायनलच्या 4 टीम ठरल्या
दरम्यान महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या चारही टीम ठरल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारताने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. गुरूवारी टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करून त्यांचं सेमी फायनलमधलं स्थान निश्चित केलं. आता सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना होणार आहे, या सामन्यात विजय मिळवणारी टीम सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे.
