14.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं लक्ष्य
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 144 धावा केल्या. त्यामुळे आता इंडिया चॅम्पियन्सना 145 धावांचे लक्ष्य 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण करायचे होते. स्टुअर्ट बिन्नीने एक बाजू लावून धरली होती, पण तरीही सेमीफायनलचे तिकीट मिळवणे कठीण वाटत होतं.
advertisement
युसूफ पठाणची एन्ट्री
अशा स्थितीत, क्रीझवर युसूफ पठाणची एन्ट्री झाली आणि बघता बघता संपूर्ण सामना पालटला. एक खेळाडू जो संघाची आशा बनून आला होता आणि एक वडील, जो आपल्या मुलाला मैदानातून 'हिरो' बनून परत येण्याचे वचन देऊन आला होता. नेमकं तेच पाहायला मिळालं. वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्धच्या 'करो या मरो'च्या या मॅचमध्ये युसूफ पठाणने 300 च्या स्ट्राइक रेटने केवळ 7 बॉलमध्ये 2 सिक्स मारत नाबाद 21 धावा केल्या.
युवराज- बिन्नीचं वादळ
टीम इंडियाकडून कॅप्टन युवराज सिंग याने 11 बॉलमध्ये 21 धावांची आक्रमक खेळी केली. तर स्टुअर्ड बिन्नी याने 21 बॉलमध्ये 50 धावा केल्या. तसेच युसुफ पठाणने अखेरीस 2 सिक्स आणि 1 फोर मारला अन् टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
धावत लेकाकडे गेला अन्...
युसूफ पठाणने आपल्या छोट्या पण वादळी इनिंगद्वारे केवळ संघाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर आपल्या मुलाला दिलेले वचनही पूर्ण केले. कदाचित यामुळेच मॅचनंतर बाप-लेकाचे सेलिब्रेशनही मैदानात पाहायला मिळाले. युसुफच्या 21 धावांसह WCL 2025 मधील सेमीफायनलपूर्वी खेळलेल्या 4 मॅचमध्ये त्याच्या एकूण 130 धावा झाल्या आहेत, ज्यात 8 सिक्स आणि 11 फोरचा समावेश आहे. युसूफ पठाण WCL 2025 मध्ये शिखर धवननंतर इंडिया चॅम्पियन्सचा दुसरा सर्वात यशस्वी बॅट्समन आहे.
