दारफळ (बीबी) या गावात राहणारे समाधान साठे हे शेतात राबणारे सामान्य कामगार होते. त्यांचं शालेय शिक्षण फक्त नववीपर्यंत झालेलं आहे. स्वत:चा नर्सरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ते दुसरीकडे कामगार म्हणून कामाला होते. कामाचा अनुभव असल्याने समाधान साठे यांनी नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2007 मध्ये एक गुंठा जागेत नर्सरी व्यवसाय सुरू केला.
advertisement
Ginger Farming: आले शेतीची कमाल, युवा शेतकरी एका वर्षात मालामाल, काय आहे यशाचा फॉर्म्युला?
सुरुवातीला त्यांनी बाहेरून कलिंगडाची तयार रोपं आणून विकली. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी स्वत: रोपांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला फक्त एक गुंठा जागेत असलेली नर्सरी आता दहा गुंठे क्षेत्रावर पसरली आहे. सर्व खर्च वजा करून साठे वर्षाला सात ते आठ लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत.
साठे यांच्या नर्सरीमध्ये टोमॅटो, झेंडू, ढोबळी मिरची, तसेच सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची रोपं मिळतात. त्यांच्या नर्सरीतील रोपं नेण्यासाठी तुळजापूर, धाराशिव, लातूर, अक्कलकोट, कर्नाटक, सांगोला या ठिकाणचे शेतकरी येतात. अंगी जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल कमी शिक्षणातही यश मिळवता येते, हे समाधान साठे यांनी दाखवून दिलं आहे.