व्हॉट्सअॅप आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे इलॉन मस्क यांनी जगातल्या सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनेक युझर्सना त्यांच्या डेटाची चिंता सतावू लागली आहे. जगात्याल सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅपवर रात्रीच्या वेळी युझर्सचा डेटा ट्रान्स्फर केल्याचा आरोप केला आहे.
advertisement
एक्सवर ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्याने एक पोस्ट केली आहे. यात 2 तासांच्या न्यूज रीकॅप होता. यात नवव्या क्रमांकावर लिहिलं होतं की व्हॉट्सअॅप रात्रीच्या वेळी युझर्सचा डेटा एक्सपोर्ट करतं. मग तो अॅनालाइज करून जाहिरातीसाठी त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅप युझर्सना ग्राहक म्हणून नव्हे तर प्रॉडक्ट म्हणून वापरत असल्याची टीका केली जात आहे.
इलॉन मस्क यांची पोस्ट
इलॉन मस्क यांनी ही पोस्ट रि- शेअर केली आणि लिहिलं, की व्हॉट्सअॅप दररोज रात्री डेटा शेअर करतं आणि अनेकांना अजूनही वाटतं की ते सुरक्षित आहे.
इलॉन मस्क यांनी याआधीही केली होती टीका
इलॉन मस्क यांनी मेटावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला मेटावर मस्क यांनी जाहिरातींच्या प्रॅक्टिसमुळे टीका केली होती. इलॉन मस्क यांनी मेटाला सुपर लालची म्हटलं होतं. त्यानंतर आता परत एकदा त्यांनी मेटावर युझर्सच्या डेटा चोरीचे आरोप केले आहेत.
एक्स पोस्टवर येतायत युझर्सच्या कमेंट्स
इलॉन मस्क यांच्या या पोस्टनंतर अनेक युझर्सच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही लोक त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका करू लागले; मात्र काही युझर्सनी त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं. त्या युझर्सनी व्हॉट्सअॅपची पॉलिसी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. याबाबत अजून व्हॉट्सअॅपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.