पण अनेकदा असं होतं की आपण ऑनलाइन असतो किंवा आपल्या हातात फोन असतो. पण अशावेळी आपल्याला कुणाचाही मेसेज नको यावा असं वाटत असतं. कारण मग अशावेळी त्या आलेल्या मेसेजला रिप्लाय देणं गरजेचं होतं, नाहीतर त्या मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज होतो की आपल्याला मुद्दाम रिप्लाय द्यायचा नाही.
अशा वेळी अडचण अशी होते की, समोरच्याला मेसेज डिलिव्हर झाल्याचं कळतं आणि आपल्याला प्रतिसाद द्यावाच लागतो. जर तुम्हालाही हीच समस्या भेडसावत असेल, तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण WhatsApp मध्ये असा एक सीक्रेट फीचर आहे, ज्यामुळे तुम्ही ठरवू शकता की मेसेज तुमच्या फोनवर यावेत की नाही.
advertisement
खास गोष्ट म्हणजे, नेट ऑन असतानाही समोरच्याला फक्त सिंगल टिक दिसेल. ज्यामुळे त्याला कळणारच नाही की तुम्हाला तो मेसेज पोहोचला आहे पण की नाही. म्हणजेच तुम्ही पूर्णपणे ठरवू शकता की कधी आणि कुणाचा मेसेज वाचायचा.
WhatsApp चं हे सीक्रेट फीचर काय आहे?
हे फीचर खासकरून Android यूजर्ससाठी आहे. यात तुम्ही एखाद्या ठराविक अॅपचा इंटरनेट वापर थांबवू शकता. म्हणजेच, WhatsApp वर मेसेज येणं बंद होईल, पण इतर अॅप्सवर (जसे की YouTube, OTT प्लॅटफॉर्म्स) तुम्ही मजेत नेट वापरू शकता.
यासाठी तुम्हाला WhatsApp च्या Data Usage ला restrict करावं लागतं.
कसं कराल ही सेटिंग?
-सर्वप्रथम आपल्या फोनच्या Settings मध्ये जा.
-तिथे Connectivity किंवा More Connectivity Options वर क्लिक करा.
-आता Data Usage हा पर्याय दिसेल.
-इथे तुम्हाला फोनमध्ये असलेल्या सर्व अॅप्सची यादी दिसेल.
-ज्या अॅपचा डेटा थांबवायचा आहे (उदा. WhatsApp), त्यावर क्लिक करा.
-आता Mobile Data चा पर्याय Off करा.
-असं केल्यावर तुमचं नेट ऑन असलं तरी WhatsApp ला इंटरनेट मिळणार नाही.
याचा परिणाम काय होईल?
तुमच्या मित्राने किंवा नातेवाईकाने मेसेज पाठवल्यानंतर त्याला फक्त सिंगल टिक दिसेल. मेसेज तुमच्या फोनवर येणारच नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्रासही होणार नाही. मात्र, तुम्ही WhatsApp उघडल्यानंतर लगेच पुन्हा मेसेज यायला लागतील.
लक्षात ठेवा ही सुविधा सर्व Android व्हर्जनमध्ये मिळत नाही. Stock Android 14 वापरणाऱ्यांना फक्त WhatsApp चं Background Data Access बंद करण्याचा पर्याय आहे.
जर तुम्हाला ऑनलाइन राहायचं आहे पण WhatsApp वर नको असलेले मेसेज टाळायचे आहेत, तर ही सेटिंग तुमच्यासाठी परफेक्ट आहे.