TRENDING:

ही आहे भारताची पहिली डीजेल बाईक, 85 Kmpl चं मायलेज! मग तरीही कंपनीने का केली बंद?

Last Updated:

आता तुम्हाल नक्कीच या गाडीबद्दल प्रश्न पडले असतील की ती कोणती गाडी आहे. आणि जर डिझेलवर चालणारी गाडी बनवली गेली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 29 नोव्हेंबर : नवनवीन गाड्या बाजारात येत असतात. ज्यामध्ये वेगवेगळे फीचर्स असतात. लोक आपला वापर आणि गरजे प्रमाणे या गाड्या विकत घेतात. हल्ली तर इलेक्ट्रिक गाड्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. बाजारात पेट्रोल आणि इलेक्ट्रीक बाईकच सध्या उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला सांगितलं की एक आशी बाईक होती जी डिजेलवर चालायची, तर तुम्ही आश्चर्य व्यक्त करु नका. कारण अशी गाडी खरोखर बाजारात होती.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

आता तुम्हाल नक्कीच या गाडीबद्दल प्रश्न पडले असतील की ती कोणती गाडी आहे. आणि जर डिझेलवर चालणारी गाडी बनवली गेली होती. तर अशा डिजेलवर चालाणाऱ्या बाईक्स का बनवल्या गेल्या नाहीतर. पेट्रोलच्या तुलनेत डिजेल स्वत आहे. अशा परिस्थीतीत डिजेल बाईक का बनवल्या गेल्या नाहीत. चला जाणून घेऊ.

रॉयल एनफिल्ड बाईक कंपनीने ही डिजेलवर चालणारी बाईक बनवली होती आणि ती इतकी यशस्वी झाली होती की ती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसली. पण कालांतराने ती गाडी बंद करावी लागली.

advertisement

ड्राईव्ह स्पार्क, ऑटोमोबाईल उद्योगाशी संबंधित वेबसाइटनुसार, रॉयल एनफील्ड बुलेट डिझेल टॉरस ही भारतातील पहिली आणि शेवटची बाइक होती जी डिझेलवर चालते. वेबसाइटनुसार, ही संपूर्ण जगात सर्वाधिक विकली जाणारी डिझेल बाइक होती. त्याचे मायलेज 85 Kmpl पर्यंत जायचे, म्हणूनच लोकांना ती खूप आवडली होती.

advertisement

या गाडीची विक्री थांबवण्याचे कारण काय?

कंपनीने ही बाईक याच कारणासाठी लॉन्च केली होती, कारण त्यावेळी डिझेलचे दर पेट्रोलच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे लोकांना ही बाईक स्वस्त वाटली आणि मायलेजही खूप जास्त आहे. पण प्रश्न असाही पडतो की जर ही बाईक सुरू झाली असेल तर ती बंद होण्यामागचे कारण काय? या बाइकची टॉप स्पीड फक्त 65 किलोमीटर प्रति तास होती.

advertisement

ते डिझेल इंजिन असल्याने त्यातून प्रचंड धूर निघत होता. काळ्या धुराच्या लोटामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरले. याशिवाय, बाईक खूपच जड होती, सुमारे 196 किलो. त्यातही खूप कंपन होत होते. एवढ्या कंपनामुळे चालकाला पाठदुखी व्हायची. ही सर्व कारणं लक्षात घेता ती बाईक कंपनीला बंद करावी लागली. आजही काही लोकांकडे ही बाईक आहे. या बाईकची बरीच चर्चा झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
ही आहे भारताची पहिली डीजेल बाईक, 85 Kmpl चं मायलेज! मग तरीही कंपनीने का केली बंद?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल