अॅपलच्या प्रत्येक सीरिजमधील प्रत्येक फोनची किंमत देशानुसार वेगळी असते. अमेरिका, कॅनडा, दुबई (यूएई), हाँगकाँग आणि व्हिएतनाम यांसारख्या देशामध्ये आयफोनच्या किमती भारतापेक्षा वेगळ्या आहेत. काही देशांमध्ये भारताच्या तुलनेत आयफोन स्वस्त मिळतात. त्यामुळे जर तुमचा एखादा नातेवाईक किंवा मित्र यापैकी एखाद्या देशात राहत असेल तर आयफोन 16 खरेदीसाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. त्यांच्या करवी तुम्ही आयफोन 16 सीरिजमधील फोन खरेदी करून काही पैशांची बचत करू शकता.
advertisement
iPhone 16 लाँच होताच युजर्सना धक्का, आयफोनचे 3 मॉडेल केले बंद
दुबई
भारतात आयफोन 16 बेस मॉडेलची किंमत 79 हजार 900 रुपये आहे. हेच मॉडेल दुबईमध्ये 76 हजार 687 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही दुबईतून फोन खरेदी केला तर तुम्ही 3 हजार 312 रुपयांची बचत करू शकाल. भारतात आयफोन 16 प्लस 89 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे. तर, दुबईमध्ये त्याची किंमत 85 हजार 712 रुपये आहे.
दोन्ही ठिकाणच्या किंमतीमध्ये 4 हजार 188 रुपयांचा फरक आहे. भारतात आयफोन 16 प्रो 1,19,900 रुपयांना मिळत आहे. दुबईमध्ये त्याची किंमत 96,993 रुपये आहे. याचा अर्थ दोन्ही ठिकाणच्या किंमतीमध्ये 22 हजार 907 रुपयांचा फरक आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स भारतात 1,44,900 रुपयांना उपलब्ध आहे, तर दुबईमध्ये तोच फोन 1,31,719 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन दुबईमधून मागवून तुम्ही 13 हजार 181 रुपयांची बचत करू शकाल.
Apple Watch 10 झाली लॉन्च, आहे स्लिम; पाहा यात कोणते हेल्थ फीचर्स?
कॅनडा
कॅनडामध्ये राहणाऱ्या तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकरवी जर तुम्ही आयफोन 16 ऑर्डर केला तर तुम्हाला फक्त 69 हजार 897 रुपये मोजावे लागतील. कॅनडामध्ये 16 सीरिजमधील इतर मॉडेल्स देखील भारताच्या तुलनेत स्वस्त आहेत. कॅनडामध्ये आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांची किंमत अनुक्रमे 79 हजार 184 रुपये, 89 हजार 709 रुपये आणि 1 लाख 08 हजार 282 रुपये आहे.
अमेरिका
अमेरिकेत आयफोन 16 बेस मॉडेल 67,096 रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन 16 प्लस आणि आयफोन 16 प्रो ही दोन मॉडेल्स अनुक्रमे 75 हजार 493 रुपये आणि 83 हजार 891 रुपयांमध्ये विकली जात आहेत. अमेरिकेत आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत फक्त 1,00,686 रुपये आहे. अमेरिकेत हे मॉडेल भारतापेक्षा सुमारे 44 हजार रुपयांनी स्वस्त आहे.
