कॉपीराइट आणि आक्षेपार्ह किंवा उत्तेजक गोष्टींपासून दूर रहा
तुमच्या माहितीसाठी, तुमच्या व्हिडिओमध्ये परमिशनशिवाय दुसऱ्याचे गाणे, चित्रपट क्लिप किंवा व्हिडिओ क्लिप कधीही वापरू नका. असे केल्याने, तुमचे अकाउंट स्ट्राइक होऊ शकते किंवा व्हिडिओ काढून टाकला जाऊ शकतो. याशिवाय, कोणाच्याही धार्मिक, वांशिक किंवा सामाजिक भावना दुखावणारी कोणताही कंटेंट पोस्ट करू नका. हे प्लॅटफॉर्म अपमानास्पद, द्वेषपूर्ण भाषण किंवा हिंसक सामग्रीविरुद्ध कठोर कारवाई करतात.
advertisement
4 Star आणि 5 Star AC च्या किंमतीत अंतर, पण खरच वीज बचत होते?
खोट्या बातम्या टाळा
आजकाल, सोशल मीडियावर खोट्या बातम्या खूप वेगाने व्हायरल होतात. ज्यामुळे कधीकधी मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत, व्हिडिओमध्ये कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊ नका, विशेषतः आरोग्य टिप्स किंवा बातम्यांच्या विषयांवर. कोणतीही माहिती देण्यापूर्वी, तिची सत्यता नीट तपासून घ्या.
एका फोनमध्ये दोन WhatsApp चालवता येतात का? पहा काय आहे प्रोसेस
हिंसक किंवा भीतीदायक दृश्ये टाळा
तुम्ही एखाद्या संवेदनशील विषयावर व्हिडिओ बनवत असलात तरी, त्यात हिंसाचार किंवा त्रासदायक दृश्ये दाखवण्यापूर्वी इशारा देणे आवश्यक आहे. असे व्हिडिओ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शेअर केल्यास तुमचा कंटेंट काढून टाकला जाऊ शकतो. यासोबतच, इंस्टाग्राम आणि यूट्यूब अश्लील किंवा लैंगिक सामग्री अजिबात सहन करत नाहीत. असे व्हिडिओ पोस्ट केल्याने खाते बॅन केले जाऊ शकते किंवा कायमचे बंद केले जाऊ शकते.