TRENDING:

Motorola Signature चा सेल झाला सुरू! या फोनवर मिळू शकतो 5 हजारांपर्यंत डिस्काउंट 

Last Updated:

Motorola Signature स्मार्टफोनचा सेल सुरु झाला आहे. हा फ्लॅगशिप फोन 16GB रॅम, स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर, 5200mAh बॅटरी, मिलिट्री-ग्रेड मजबुती आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 सारख्या वैशिष्ट्यासह येतो. या फोनवर तुम्ही 5500 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Motorola च्या प्रीमियम फीचर्ससह लॉन्च झालेला स्मार्टफोन Signature चा सेल आज दुपारी 12 वाजेपासून ग्राहकांसाठी सुरु झाला आहे. तुम्हीही या फ्लॅगशिप फीचर्सच्या फोनच्या खरेदीचा प्लॅन करत असाल तर हा फोन तुम्हाला 16 जीबीपर्यंत रॅम, स्नॅपड्रॅगन चिपसेट , 5200 एमएएच बॅटरी, मिलिट्री ग्रेड मजबुती आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 सारख्या फीचर्ससह मिळेल. चला पाहूया हा फोन किती रुपयांत मिळेल आणि या हँडसेटमध्ये कोणकोणते खास फीचर्स दिले आहेत.
मोटोरोला सिग्नेचर प्राइज
मोटोरोला सिग्नेचर प्राइज
advertisement

Motorola Signature Price in India

या मोटोरोला स्मार्टफोनचा 12 जीबी/256 जीबी व्हेरिएंट 59,999 रुपयांना उपलब्ध असेल, तर 16 जीबी/512 जीबी व्हेरिएंट 64999 रुपयांना उपलब्ध असेल. जर तुम्ही 16 जीबी रॅम असलेला 1 टीबी व्हेरिएंट खरेदी केला तर त्याची किंमत 69,999 रुपये असेल.

Instagram तुमचं बोलणं ऐकतेय का? थोडाही संशय असेल तर लगेच बदला ही सेटिंग

advertisement

Motorola Signature Alternatives

हा प्रीमियम मोटोरोला फोन OnePlus 15, Realme GT 7 Pro आणि Samsung Galaxy S25 FE सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतो. हे सर्व फोन तुम्हाला 50,000 ते 70,000 रुपयांच्या किमतीत मिळतील.

फ्लिपकार्ट ऑफर्स

तुम्हाला हा लेटेस्ट स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करायचा असेल, तर तुम्ही बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. HDFC आणि Axis Bank कार्ड पेमेंटवर तुम्ही 5000 रुपयांपर्यंत (नॉन-EMI) सूट मिळवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही HDFC आणि Axis Bank क्रेडिट कार्ड (EMI) व्यवहारांवर 5500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

advertisement

Motorola Signature Specifications

स्क्रीन: 6.8 इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले असलेला हा फोन 165Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय, फोनमध्ये डॉल्बी व्हिजन, 6200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR10+ कंटेंट सपोर्ट सारख्या फीचर्सचा समावेश आहे. फोनमध्ये स्मार्ट वॉटर टच फीचर देखील आहे, म्हणजेच तुम्ही ओल्या बोटांनीही फोन चालवू शकता.

advertisement

Android फोन चोरी होऊनही डेटा राहील सेफ! Googleने जोडले नवे फीचर्स

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 5 ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर झाला आहे.

कॅमेरा: मागील बाजूस OIS सह 50MP Sony LYT 828 प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP Sony LYT 600 सेन्सर आहे. हा फोन 100x हायब्रिड झूम आणि 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. समोरील बाजूस सेल्फीसाठी 50MP Sony LYT 500 कॅमेरा सेन्सर आहे. फोन 8K/30 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास देखील सक्षम आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

बॅटरी : फोनमध्ये प्राण फुंकण्यासाठी 5200 एमएएचची दमदार बॅटरी आहे जी 50W वायरलेस आणि 90 वॉट वायर्ड आणि 90 वॉट वायर्ड चार्ज सपोर्ट करते. एवढेच नाही, हा फोन तुम्हाला 5W वायर्ड रिवर्स आणि 10W वायरलेस चार्ज सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, फोन सिंगल चार्जमध्ये एकदा चार्ज केल्यावर 41 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Motorola Signature चा सेल झाला सुरू! या फोनवर मिळू शकतो 5 हजारांपर्यंत डिस्काउंट 
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल