TRENDING:

मोबाईल फोनमध्ये 2-2 मायक्रोफोन का असतात? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही

Last Updated:

स्मार्टफोन कंपन्या मायक्रोफोनची संख्या का वाढवत आहेत? चला, या तंत्रज्ञानामागचं कारण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्मार्टफोन कॅमेरा, बॅटरी किंवा प्रोसेसरबद्दल तर आपण सतत बोलत असतो. पण फोनमध्ये असणारे मायक्रोफोन किती असतात, ते काय काम करतात… याकडे मात्र आपलं लक्ष क्वचितच जातं. आजच्या आधुनिक स्मार्टफोनमध्ये एक नव्हे तर दोन, कधीकधी तीन मायक्रोफोनही दिले जातात. मग प्रश्न असा पडतो की एक मायक्रोफोन पुरेसा नसतो का?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

स्मार्टफोन कंपन्या मायक्रोफोनची संख्या का वाढवत आहेत? चला, या तंत्रज्ञानामागचं कारण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ.

फक्त आवाज नाही… ‘क्लिअर’ आवाज महत्त्वाचा, त्यामुळे स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोफोन ठेवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नॉइज कॅन्सलेशन. पहिला मायक्रोफोन तुमचा आवाज रेकॉर्ड करतो. तर दुसरा आजूबाजूचा आवाज पकडतो. यानंतर फोनची AI सिस्टीम अनावश्यक आवाज काढून टाकते आणि तुमचा आवाज अगदी क्रिस्टल-क्लियर करते. याचा फायदा कॉलिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉइस नोट्स… सगळीकडे मिळतो.

advertisement

व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मिळतो स्टुडिओसारखा परिणाम

एवढच नाही तर या दोन मायक्रोफोनमुळे व्हिडिओ शूट करताना आवाज कोणत्या दिशेने येतो, किती दूर आहे यावर क्वालिटी बदलते. दोन मायक्रोफोन एकत्र काम करून स्टिरिओ ऑडिओ तयार करतात. त्यामुळे हे ऐकायला भारी वाटतं.

हे दोन्ही सुंदररीत्या बॅलन्स होतात. त्यामुळे आउटडोअर शूटिंग, ट्रॅव्हल व्लॉग्स किंवा रील्समध्ये आवाज जास्त प्रोफेशनल वाटतो.

advertisement

वॉयस कमांड अधिक अचूक ऐकण्यासाठी

आजचे फोन Siri, Google Assistant आणि AI कमांडवर चालतात. दोन मायक्रोफोन असल्याने फोन तुमचा आवाज दूरूनही नीट ऐकतो.

मागे म्युझिक चालू असो, खोलीत आवाज असो…पण तुम्ही “OK Google” किंवा “Hey Siri” म्हटलात तर ती सहज ओळखते.

कॉल करताना आवाज भिंतींवरून परत येऊन इको तयार होतो. सेकंडरी मायक्रोफोन हा इको ओळखतो आणि फिल्टर करतो.

advertisement

परिणामी कॉल अधिक स्पष्ट ऐकून येतो, आवाज कमी वेळा कट होतो आणि स्मूथ अनुभव मिळतो.

वारा, ट्रॅफिक, गर्दी… भारी आवाजांवरही कंट्रोल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

आउटडोअर शूटिंगमध्ये वाऱ्याचा ‘विंड नॉइज’ किंवा ट्रॅफिकचा मोठा आवाज तुमचा आवाज झाकून टाकतो. दुसरा मायक्रोफोन अशा भारी आवाजाला कमी करतो. म्हणून तुम्ही फिरत असलात, बाइकवर असलात किंवा प्रवासात तरीही तुमचा आवाज स्पष्ट रेकॉर्ड होतो.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
मोबाईल फोनमध्ये 2-2 मायक्रोफोन का असतात? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल