फसवणूक कशी झाली?
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉक्टरने ही जाहिरात यूट्यूबवर पाहिली. त्यावर क्लिक करताच ते एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड झाले. या गटातील काही लोक अनुभवी गुंतवणूकदार असल्याचे सांगून शेअर बाजारातून पैसे कमावण्याच्या ट्रिक सांगत होते. एका रिपोर्टनुसार, प्रोफेसर या ग्रुपमध्ये सामील झाले आणि हळूहळू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. सुरुवातीच्या दिवसांत या व्हॉट्सॲप ग्रुपने डॉक्टरांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याविषयी माहिती दिली, ज्यामुळे त्यांना असे वाटले की हे लोक खरोखरच फायदेशीर आहेत. हा ग्रुप दिवाकर सिंग नावाचा एक व्यक्ती चालवत होता, जो अनेकदा शेअर्स खरेदी-विक्रीच्या टिप्स देत होता. डॉक्टरांनी या लोकांवर विश्वास ठेवला आणि ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंटही उघडले.
advertisement
Home Loan कधी होणार स्वस्त? मोठ्या सरकारी बँकेने दिला संकेत
त्यांच्या सूचनेनुसार गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे ग्रूपमधील उपस्थित लोकांनी डॉक्टरांना आश्वासन दिले. आपला पैसा भारत आणि अमेरिकेतील बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवला जाईल, असा दावा त्यांनी केला. फसवणूक करणाऱ्यांनी काही शेअर्स आणि नवीन कंपन्यांचे नाव घेऊन 30% नफ्याचे आमिष दाखवले, त्यामुळे डॉक्टरांनी तीन आठवड्यात त्यांना 76.5 लाख रुपये सुपूर्द केले.
पोलिसांत तक्रार दाखल केली
22 ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना आणखी 50 लाख रुपये जमा करावे लागतील असं सांगण्यात आले. कारण ही बनावट संस्था होती. याचा डॉक्टरांना संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांना वाटले. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बिटकॉइन-क्रिप्टो गुंतवणूकदारांचे अच्छे दिन! 7 दिवसात दिलाय छप्परफाड रिटर्न
काय आहेत बचावाचे उपाय?
पोलिस आणि सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते, लोकांनी अशा ऑनलाइन जाहिरातींपासून सावध रहावे जे लोकांना झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवतात. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका आणि तुमची बँक डिटेल्स कोणत्याही अज्ञात ग्रुपसोबत शेअर करू नका असा सल्ला तज्ज्ञ देतात.